Type Here to Get Search Results !

अखिल भारतीय ग्राहक पंचायत लोकशाही दिन उत्साहात

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

अखिल भारतीय ग्राहक पंचायत लोकशाही दिन उत्साहात.



दि.१८/०६/२०२४ रोजी फलटण तहसील कार्यालयामध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायत लोकशाही दिना निमित्त फलटण तहसीलदार डॉ.अभिजीत जाधव यांना फलटण तालुक्यातील नागरिकांच्या सर्व प्रकारच्या अडचणींचे निवारण करण्यासाठी वेगवेगळ्या विषयांचे निवारण करण्यासाठी निवेदन देण्यात आले. यामध्ये १) तहसील कार्यालय फलटण परीसरामधील स्वच्छतागृहाची दुरवस्था आहे त्या स्वच्छतागृहाची  साफसफाई करून घेण्यात यावी.२) आयुष्यमान भारत योजनेचा लाभ कुटुंबातील ७ व्यक्ती पैकी फक्त ३ व्यक्तींच्या नावाचा यादीमध्ये समाविष्ट होतो तर उर्वरित नावाचा समावेश करून मिळवा ही विनंती.३) फलटण तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये एसटी बस चालु करावी.तसेच लोणंद- फलटण मार्गावरील प्रत्येक गावच्या एसटी थांबा या ठिकाणी प्रत्येक आगाराच्या एसटी बसेस थांबा चालू करण्यात यावा, यामध्ये लोणंद- फलटण मार्गावरील फक्त तरडगावच्या ठिकाणीच सर्व आगाराच्या एसटी बसेस थांबतात परंतु काळज, बडेखान, सुरवडी, निंभोरे, वडजल, तांबमाळ, या ठिकाणी फक्त शटल सेवा बस थांबते. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना व ज्येष्ठ नागरिक, महीला  यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ठरलेल्या वेळेप्रमाणे फलटण आगाराची बस वेळेत कधीच येत नाही दोन ते तीन तास नागरिकांना एसटी बस ची वाट पाहावी लागत आहे.४)  सोमंथळी व कांबळेश्वर रस्त्यावरील बाणगंगा नदीवरील पुलाच्या बांधकामाबाबत.५) फलटण शहर  परिसरामध्ये डास निर्मूलनाची फवारणी करण्यात यावी. या संपूर्ण तक्रारींचे निवारण होण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी तहसीलदार कार्यालय मध्ये उपस्थित होते.या संपूर्ण तक्रारीचे निवेदन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कार्यकारणीचे सर्व सदस्यांनी फलटण तहसीलदार डॉ.अभिजीत जाधव यांच्याकडे दिले.यावेळी  श्री. एन डी काळे  सो.महसूल नायब तहसिलदार. श्री.किशोर काकडे  अव्वल कारकुन, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे फलटण तालुका अध्यक्ष- तानाजी भानुदास सोडमिसे. कोषाध्यक्ष-राजन बबन भोसले. फलटण तालुका सचिव -जगन्नाथ कृष्णा रिटे. संघटक- सदाशिव रामचंद्र मोहिते, सहसचिव -मारुती आप्पा पिसाळ.सातारा जिल्हा सचिव -आप्पासाहेब लक्ष्मण पिसाळ. फलटण तालुका कार्यकारणी सदस्य-मारुती बाजीराव मोहिते,वैभव साहेबराव जगताप,उपस्थित होते.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments