सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
धोम - बलकवडी आणि भाटघरच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु.
फलटण दि. २१ : धोम - बलकवडी, नीरा - देवघर, वीर व गुंजवणी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाला समाधानकारक नसली तरी यापूर्वी सुरुवात झाली असताना आता भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही काल पावसाला समाधानकारक सुरुवात झाली आहे, सर्व धरणे भरतील अशी अपेक्षा करायला हरकत नसावी.
२३ टीएमसी क्षमतेच्या भाटघर धरण परिसरात आज सकाळी संपलेल्या २४ तासात ११ मि. मी. पाऊस झाला, आजपर्यंत १४२ मि. मी. पाऊस झाला आहे. धरणात १.४७ टीएमसी म्हणजे ६.२७ टक्के पाणी साठा आहे.
१० टीएमसी क्षमतेच्या वीर धरण परिसरात आज सकाळी संपलेल्या २४ तासात ०.०० मि. मी. पाऊस झाला असून आजपर्यंत १२० मि. मी. पाऊस झाला आहे. धरणात १.८९ टीएमसी म्हणजे २०.०८ टक्के पाणी साठा आहे.
१२ टीएमसी क्षमतेच्या नीरा - देवघर धरण परिसरात काल ३९ मि. मी. पाऊस झाला असून आजपर्यंत १२७ मि. मी. पाऊस झाला आहे. धरणात
१.०६ टीएमसी म्हणजे ८.९९ टक्के पाणी साठा आहे.
४ टीएमसी क्षमतेच्या गुंजवणी धरण परिसरात काल ७ मि. मी. पाऊस झाला असून आजपर्यंत १३२ मि. मी. पाऊस झाला आहे. धरणात ०.३६ टीएमसी म्हणजे ९.७५ टक्के पाणी साठा आहे.
४ टीएमसी क्षमतेच्या धोम - बलकवडी धरण परिसरात काल ५१ मि. मी. पाऊस झाला असून आजपर्यंत १५६ मि. मी. पाऊस झाला आहे. धरणात ०.०१ टीएमसी म्हणजे ०.३२ टक्के पाणी साठा आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments