सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
दुहेरी मोक्कयामधील २ वर्ष फरारी आरोपीस अटक.
दुहेरी मोक्कयामध्ये सुमारे ०२ वर्षापासुन पाहिजे असलेला आरोपी साराईत आरोपी नामे अतुल लायलन ऊर्फ नायलन भोसले वय २६ वर्षे
रा. कासारी ता. आष्टी जि.बीड यास शिताफिने केली अटक
मा. श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी
सातारा जिल्हयातील गुन्हयामध्ये पाहिजे असलेले / फरारी आरोपी यांचा शोध तपास घेवुन त्यांना ताब्यात घेणेबाबतच्या सुचना
जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना दिलेल्या आहेत.
सातारा जिल्हयामध्ये सन २०२२ मध्ये वडुज, व उंब्रज भागामध्ये दरोडा टाकुन फिर्यादींना मारहाण केले बाबतचे गुन्हे
दाखल होते. सदर गुन्हयाच्या तपासामध्ये स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांनी परजिल्हयातील टोळी निष्पन्न करुन त्यामध्ये
टोळी प्रमुख आरोपी होमराज ऊर्फ होम्या उध्दव काळे रा. वाकी शिवर ता. आष्टी जि.बीड याने त्याच्या साथीदारांचे मार्फतीने
१) वडुज पोलीस स्टेशन, गुन्हा रजि. नं. ६४ / २०२२ भा.दं.वि.सं.क. ३९५, ३९७, सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण
कायदा कलम ३(१)(ii), ३(२), ३(४) व २) उंब्रज पोलीस ठाणे गुरनं उंब्रज पोलीस स्टेशन, गुन्हा रजि.नं. ८२ / २०२२
भा.दं.वि.सं.क. ३९५, ३९७, ४१२, ४१३ सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम ३ (१) (ii), ३ (२), ३(४)
अन्वये गुन्हे केलेचे निष्पन्न झालेने त्यामध्ये टोळी प्रमुख आरोपी होमराज ऊर्फ होम्या उध्दव काळे रा. वाकी शिवर ता. आष्टी
जि.बीड व त्यांचे साथीदारांना अटक करुन त्यांचेवर मोक्का कायदयान्वये कारवाई करणेत आलेली आहे.
सदर गुन्हयामध्ये टोळी प्रमुख होमराज ऊर्फ होम्या उध्दव काळे रा. वाकी शिवर ता. आष्टी जि.बीड याचा खास
साथीदार अतुल लायलन ऊर्फ नायलन भोसले वय २६ वर्षे रा. कासारी ता. आष्टी जि.बीड हा इतर आरोपींना अटक केले
पासुन परागंदा झाला होता तो कोठेच मिळुन येत नव्हाता. सदर आरोपी हा फलटण जि.सातारा येथे येणार असल्याची माहिती
खास बातमीदाराकडुन प्राप्त झालेने सपोनि सुधीर पाटील, व त्यांचे टिम ने त्यास पाटलाग करुन ताब्यात घेतले आहे.
सदर आरोपी अतुल लायलन ऊर्फ नायलन भोसले वय २६ वर्षे रा. कासारी ता. आष्टी जि.बीड हा १) वडुज पोलीस
स्टेशन, गुन्हा रजि. नं. ६४ / २०२२ भा.दं.वि.सं.क. ३९५, ३९७, सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा
३(१)(ii), ३(२), ३(४) व २) उंब्रज पोलीस ठाणे गुरनं उंब्रज पोलीस स्टेशन, गुन्हा रजि. नं. ८२ / २०२२ भा.दं.वि.सं.क. ३९५,
३९७, ४१२, ४१३ सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम ३ (१) (ii), ३(२), ३(४) या दोन मोक्कयामध्ये
सुमारे ०२ वर्षोपासुन पाहिजे असलेला आरोपी आहे.
सदर कारवाई मध्ये श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक,
सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण देवकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा, सहायक पोलीस निरीक्षक
सुधीर पाटिल, पृथ्वीराज ताटे, रोहीत फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, सहा पोलीस फौजदार सुधीर
बनकर, पो.हवा. साबीर मुल्ला, मंगेश माहाडीक, सचिन साळुंखे, सनी आवट, मुनीर मुल्ला, अमित झेंडे, अजय जाधव,
अमित सपकाळ, प्रमोद सावंत, राजु कांबळे, मनोज जाधव, अमोल माने, पो. कॉ. धिरज महाडीक, मोसीन मोमीन तसेच चालक
विजय निकम अमृत कर्पे सर्व स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी सहभाग घेतला असुन कारवाईत सहभागी अधिकारी
अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी अभिनंदन केले आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments