Type Here to Get Search Results !

फलटणमध्ये जमिनीच्या व्यवहारातील पैशाच्या वादातून महिलेचा विनयभंग.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

फलटणमध्ये जमिनीच्या व्यवहारातील पैशाच्या वादातून महिलेचा विनयभंग.



 दिनांक14/06/2024रोजी रात्रौ.9.30 वा. चे सुमारास लक्ष्मी नगर फलटण येथील महिला फिर्यादीच्या घरी  1)कुंडलिक वसंत नेटके, 2) रेखा वसंत नेटके, 3)संदीप कुंडलिक नेटके, 4)वैभव कुंडलिक नेटके सर्व रा. नाईकबोमवाडी ता. फलटण जि. सातारा यांनी जमीनीच्या व्यवहारातील झालेल्या पैशाच्या कारणावरून फिर्यादी महीलेच्या घरातील हॉलमध्ये येवून कुंडलिक वसंत नेटके यांनी फिर्यादी चा विनयभंग केला. तसेच त्याने माझ्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची मोहनमाळ घेवून गेला तसेच त्याने फिर्यादी महीलेच्या मुलीस मारहाण केली व रेखा वसंत नेटके, संदीप कुंडलिक नेटके, वैभव कुंडलिक नेटके यांनी  शिवीगाळ केली तसेच कुंडलिक नेटके म्हणाला की, तुम्ही आमचे पैसे नाही दिले तर मी तुम्हाला बघून घेतो, मी परत 18 तारखेला येणार आहे, त्यावेळी तुम्ही पैसे नाही दिले तर एकएकाला संपवून टाकतो  अशी धमकी दिली म्हणून फिर्यादीने 1)कुंडलिक वसंत नेटके, 2)रेखा वसंत नेटके, 3)संदीप कुंडलिक नेटके, 4)वैभव कुंडलिक नेटके सर्व रा. नाईकबोमवाडी ता. फलटण जि. सातारा यांचेविरूध्द फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली असुन आरोपींच्या विरुद्ध  दि.18/06/2024रोजी गुरंन व कलम 305/2024 भादविकस 452,354,323,327,504,506,34 प्रमाणे अटक करून  न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडी दिली आहे सदर गुन्ह्याचा तपास पोनि नितीन शिंदे फलटण शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments