सह्याद्री निर्भिड न्यूज
सातारा/ वैभव जगताप
अमली पदार्थांची तस्करी करणारा आरोपी नागपूर शहर पोलीसांच्या ताब्यात.
उपरोक्त विषयान्वये सादर आहे की, पो.ठाणे. हुडकेश्वर, नागपूर शहर हद्दी मध्ये प्लॉटनं 124, पवनपुत्र नगर, उमरेड रोड, बहादुरा फाटा सार्वजनिक रोडवर, नागपूर शहर येथे
आरोपी नामे
1).रोहन सुरेश ढाकुलकर, वय 28 वर्ष, रा. प्लॉट नं 124, पवनपुत्रनगर, उमरेड रोड, बहादुरा फाटा,पोलीस ठाणे हुडकेश्वर, नागपूर शहर 2) शुभम सुरेश ढाकुलकर वय 31वर्ष रा. प्लॉट नं 124, पवनपुत्रनगर उमरेड रोड, बहादुरा फाटा, पोलीस ठाणे हुडकेश्वर, नागपूर शहर 3.) वेदांत विकास ढाकुलकर वय 24 वर्ष रा. घर नं. 66, नेताजी मार्केट, जानकी टॉकीज मागे, पो.ठाणे धंतोली नागपुर शहर हे घटना तारिख 18 / 06 / 2024 रोजी वर नमुद ठिकाणी यातील वर नमुद आरोपीची संशयावरुन एन.डी.पी.एस. अॅक्टचे तरतुदीचे तंतोतंत पालन करून दोन पंचा समक्ष पाहनी करून त्याची झडती घेतली असता, त्यांचे ताब्यातुन घटनास्थळ जप्ती पंचनामा प्रमाणे 71 ग्रॅम 11 मिली ग्रॅम एम. डी. (मेफेड्रॉन ड्रग्ज पावडर) कि. अं. 7,11,100/-रूपये, चार मोबाईल एकुण किं.अं. 40,000/- रुपये, ग्रे रंगाची अॅक्टीव्हा मोपेड गाडी क्र. एम.एच.31.एफ.व्ही. 8427 अं. किं. 70,000/- रूपये, एक सिल्वर रंगाचा ईलेक्ट्रॉनिक काटा किं.अं.1,500/- रूपये तसेच 22,500 /- रूपये नगदी असा एकुण 8,45, 100 /- रूपयाचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करून ताब्यात घेतला. वरिल तिन्ही आरोपी व पाहिजे आरोपी नामे तबरेज आलम उर्फ टिपु अफरोज आलम याने अमली पदार्थ विक्रीसाठी पुरविल्याने त्यांचेविरूध्द पोलीस ठाणे हुडकेश्वर, नागपूर शहर येथे कलम 8 ( क ), 22 (क), 29 एन.डी.पी.एस.अॅक्ट-1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, रविन्द्र सिंगल सो. नागपूर शहर, मा. सह पोलीसआयुक्त अश्वती दोरजे सो, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), नागपुर शहर श्री. संजय पाटील,मा. पोलीस उपायुक्त (गुन्हे), नागपुर, मा. सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे), नागपुर शहर श्री.अभिजीत पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कविता इसारकर, पो.हवा. सचीनब ढिये, लक्ष्मण चौरे, शेषराव राऊत, अजय पौनिकर, अश्विन मांगे, कुणाल मसराम, समिर शेख,प्रकाश माथनकर, नितीन वासने, पुनम शेन्डे सर्व सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा नागपुर शहर यांचेसह यशस्वी करण्यात आली.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments