Type Here to Get Search Results !

खून करुन गळफास बनाव करणाऱ्या आरोपीस वडुज पोलिसांनी केली अटक .

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

खून करुन गळफास बनाव करणाऱ्या आरोपीस वडुज पोलिसांनी केली अटक .


दि. १६/०६/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजणेचे सुमारास वडुज पोलीस ठाणे

हदिदत मौजे कणसेवाडी गावचे हददीत डोंगाराचे जवळ कैलास बनसोडे यांच्या शेताच्या

बांधावरील पिंपरणीच्या झाडाला विजय महादेव डोईफोडे वय ३४ वर्षे रा. कणसेवाडी याने गळफास

घेतल्याबाबत त्याचा चुलत भाऊ गोविंद शंकर डोईफोडे याने वडूज पोलीस ठाणेस अकस्मात मयत

नंबर २४ / २०२४ सी.आर.पी.सी. कलम १७४ प्रमाणे तक्रार दिल्याने पोलीस अंमलदार यांनी

त्याठिकाणी जावून प्रेताचा पंचनामा केला त्यावेळी मयत विजय डोईफोडे याचे डोकीस डावे वाजूस

आकाळावर व कपाळावर जखमेचा व्रण दिसला तसेच त्याचे छातीवर ओरखडलेले दिसले व

मानेवरगळफासाचा गर्द व्रण तसेच मयताची हनुवटी पुढील बाजूस झुकलेली दिसल्याने तसा

सविस्तर पंचनामा करुन प्रेताचे ग्रामीण रुग्णालयात वडूज येथे पोस्टमार्टेम केले. तसेच मयत

घडले त्यादिवशी मयताचे चप्पल व मोबाईल सोबत नसल्याचे लक्षात आल्याने त्याचा शोध घेतला

असता मयत घडले ठिकाणापासून १२ किलो मीटर अंतरावरती कातरखटाव ते एनकूळ माळ

रानावरती मयताचे चप्पला दिसल्या तसेच त्याचा मोवाईल मिळून आला नसल्याने सदर मयतेबाबत

पोलीसांना संशय असल्याने तपासीक अंमलदार पो. हवा. २२६३ खाडे व पो. कॉ. १३१६ शिरकुळे

यांनी मोबाईलचे तांत्रिक माहितीवरुन तसेच कणसेवाडी डोंगर परिसरात फिरुन सदर मयताच्

अनुषंगाने काही संशयित वस्तू मिळून येतात का याची पाहणी करीत असताना दिनांक

१८/०६/२०२४ रोजी मयत घडले ठिकाणापासून पश्चिमेस १ किलो मीटर अंतरावरती निर्जन

ठिकाणी ट्रॅक्टरच्या टायरचे मार्क दिसल्याने त्याअनुषंगाने गोपणीय बातमीदार तसेच तो रस्ता

येणारे वस्तीवरील लोकांच्याकडे विचारपूस करुन यातील मयत विजय डोईफोडे हा मयत

घडण्यापूर्वी अधिक बावा जाधव याचेबरोवर वडूज येथे दिवसा होता अशी प्राप्त माहितीवरुन

अधिक बाबा जाधव याचे घरासमोर गेले असता त्याठिकाणी निर्जन ठिकाणी मिळून आलेल्या

ट्रॅक्टरचे वाहनाचे चाकाची नकशी एकसारखी दिसल्याने संशय बळावला तसेच संशयीत अधिक

जाधव हा घरी नसल्याने त्याचा कातरखटाव परिसरात शोध घेवून तो मिळून येताच त्यास

विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यास अधिक विश्वासात

घेवून विचारले असता संशयीत अधिक जाधव याने सांगितले की, यातील मयत विजय महादेव

डोईफोडे हा दि.१५/०६/२०२४ रोजी माझेसोबत ज्वारी घेवून वडूज येथे आला होता त्याठिकाणी मी

त्यास दारु पाजून सायंकाळी ७.०० वाजणेचे सुमारास कातरखटाव येथे आलो त्यावेळी माझे

मनामध्ये विजय डोईफोडे याने गेल्या महिन्यामध्ये मी त्याचे घराकडे गेल्याचे कारणावरुन माझेंशी

बाचाबाची करुन माझी वदनामी केल्याचा राग माझे मनात असल्याने रात्रौ ८.०० वाजणेचे सुमारास

विजय डोईफोडे यास पुन्हा दारु पाजून आपण एम. एस. ई.वी.चे राव स्टेशनचे पाठीमागे एनकूळ

रोडला माळ रानावरती ट्रक्टरमधून गावाकडे जात असताना निर्जन ठिकाणी लघवी खाली

उतरण्यासाठी ट्रॅक्टर थांबवून विजय डोईफोडे हा वेसावध असताना त्याचेच गळयातील शालीने

गळा आवळून त्यास जिवे ठार मारुन त्यास ट्रॉलीमध्ये टाकून ट्रक्टर व ट्रॉली कणसेवाडी डोंगराचे

कडेला आड रानात लावून विजय डोईफोडे यास मी खांदयावरती घेवून जावून पिंपपरणींच्या

झाडाला मारलेल्या शालीने लटकविले आहे. अशी कबूली यातील आरोपी अधिक बाबा जाधव

रा. कणसवाडी ता. खटाव जि.सातारा याने दिली असल्याने त्यास खूनाचे गुन्हयात अटक केली आहे.

सदरची कारवाई मा. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, मा. अपर पोलीस

अधीक्षक सातारा श्रीमती आंचल दलाल, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग

श्रीमती अश्विनी शेंडगे यांचे मार्गदर्शनाखाली पोनि घनश्याम सोनवणे सपोनि अमोल माने,

पो. हवा. शिवाजी खाडे, पो. कॉ.गणेश शिरकुळे, पो.हवा. मल्हारी हांगे, पो. कॉ. सत्यवान खाडे,

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121

पो. कॉ. कुंडलिक कटरे, पो. कॉ. सागर वदडे, पो. कॉ. किरण चव्हाण पो.कॉ. पुष्कर जाधव,

पो. कॉ. गजानन वाघमारे, पोहवा अमोल चव्हाण यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments