सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/ वैभव जगताप
साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागात "रत्नबन शिष्यवृत्ती" प्रदान कार्यक्रम संपन्न!
साखरवाडी ( तालुका फलटण , जिल्हा सातारा) येथील साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागाचे माजी विद्यार्थी असलेल्या श्री विरेंद्र बबनराव जाधव यांनी सुरू केलेल्या रत्नबन प्रतिष्ठान च्या वतीने साखरवाडी विद्यालयातील इयत्ता ९ वी उत्तीर्ण हुशार होतकरू विद्यार्थी विद्यार्थिनींना एकूण ११०००/- रुपये शिष्यवृत्तीचे वाटप साखरवाडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री धनंजय दादा साळुंखे पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आले. यावर्षी कुमार काटे प्रतीक विजय , कुमारी काकडे गौरी विठ्ठल , कुमारी चव्हाण पौर्णिमा शिवराज आणि कुमारी काटकर श्रावणी संदीप या इयत्ता १० वी तील ४ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती प्राप्त झाली.याप्रसंगी साखरवाडी शिक्षण संस्थेचे संचालक माननीय श्री राजेंद्र शेवाळे , श्री कौशल भोसले ,माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माननीय सौ उर्मिलाताई जगदाळे , पर्यवेक्षक श्री तुळशीदास बागडे तसेच रत्नबन प्रतिष्ठान चे अध्यक्ष माननीय श्री विरेंद्र जाधव , उपाध्यक्ष श्री विनोद जाधव , सचिव श्री हरिदास सावंत , सदस्य श्री शरद जाधव , जाधव परिवारातील श्री बबनराव जाधव , सौ रत्नमाला जाधव , सौ रेश्मा जाधव , कुमारी राधा जाधव ,कुमार ऋतुराज जाधव त्याचप्रमाणे साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी व काही पालक उपस्थित होते.श्री विरेंद्र जाधव हे सध्या ओमान येथे एका परदेशी इन्स्टिट्यूट मध्ये उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत असून साखरवाडी विद्यालय या आपल्या शाळेविषयी त्यांना नितांत आदर आहे .त्यातूनच गेली ३ वर्षे ते आपल्या आई वडिलांच्या नावाने ही शिष्यवृत्ती प्रदान करत आहेत . आपल्या मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देवून भविष्यात आणखी काही उपक्रम राबविण्याचे सूतोवाच केले.प्रतिष्ठान चे सचिव तथा विद्यालयातील सहाय्यक शिक्षक श्री हरिदास सावंत यांनी प्रतिष्ठान च्या कार्याचा आढावा सादर करून शुभेच्छा दिल्या.श्री सुनील भोसले सर यांनी आभार प्रदर्शन केले.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments