Type Here to Get Search Results !

गहाळ किंवा चोरी झालेले 28 मोबाईल शाहुपुरी पोलिसांच्या कडून मुळ मालकांना परत.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

गहाळ किंवा चोरी झालेले 28 मोबाईल शाहुपुरी पोलिसांच्या कडून मुळ मालकांना परत.


शाहुपूरी पोलीस ठाणे हद्दीतून नागरिकांचे गहाळ झालेले एकुण 6,50,000/-

रुपये किंमतीचे 28 मोबाईल शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडुन हस्तगत

शाहुपूरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोबाईल गहाळचे प्रमाण वाढल्याने मा. पोलीस अधीक्षक

श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, मा. उपविभागीय पोलीस

अधिकारी श्री. राजीव नवले यांनी पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सावंत्रे यांना नागरिकांचे हरविलेले

मोबाईलचा शोध घेणे कामी सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सावंत्रे

यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी श्री. कुमार ढेरे व पोलीस अंमलदार यांना

नागरिकांचे हरविलेले मोबाईलचा शोध घेणे कामी मार्गदर्शन करुन सुचना दिलेल्या होत्या.

त्याअनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेतील तांत्रिक पथकाचे एम. बी. बनकर पो. ना. 2273

व पथकाने सी.ई.आय. आर पोर्टल व इतर तांत्रिक प्राप्त करुन महाराष्ट्रातील व इतर राज्यातील

मोबाईल मिळालेल्या लोकांशी नियमित संपर्क करुन चिकाटीने सदरची मोहिम राबविल्याने शाहुपूरी

पोलीस ठाणे हद्दीतून नागरिकांचे गहाळ झालेले एकुण 6,50,000/- रुपये किंमतीचे 28 मोबाईल

हस्तगत करण्यात यश आलेले आहे. सदरची मोहिम मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अपर

पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजीव नवले यांचे

मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारे सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे शाहुपूरी पोलीस ठाणेचे

पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सावंत्रे यांनी सांगितले आहे.

अशाप्रकारे शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने सी.ई.आय. आर पोर्टल व इतर तांत्रिक

माहितीच्या आधारे महाराष्ट्रातुन व इतर राज्यातुन नागरिकांचे गहाळ झालेले एकुण 6,50,000/-

रुपये किंमतीचे 28 मोबाईल हस्तगत करुन मुळ मालकांना परत करण्यात आले आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती

आंचल दलाल, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजीव नवले पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र

सावंत्रे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी श्री. कुमार ढेरे व पोलीस

अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, जोतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे,

सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे, महेश पवार, प्रशांत मोरे यांनी केली आहे.

आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://chat.whatsapp.com/EAcU5UeglYl6sOte0VCfZL

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments