Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन,समाज कल्याण सहाय्यक आयुक्त-नितीन उबाळे

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

साखरवाडी/वैभव जगताप 

मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन,समाज कल्याण सहाय्यक आयुक्त-नितीन उबाळे 


सातारा दि. 29 : - राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना भारतातील तीर्थ क्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु करण्यात आली आहे. याचा जिलह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी केले आहे.

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करुन देणे या योजनेचे उद्दिष्ट आहे.    योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश राहील. निर्धारीत तीर्थस्थळांपैकी एक स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तींना या योजनेचा एकवेळ लाभ घेता येईल. तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती 30 हजार इतकी राहील. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी बाबींचा समावेश आहे.


Post a Comment

0 Comments