Type Here to Get Search Results !

गंभीर व क्लीष्ट खूनाचा गुन्हा कोणतेही धागेदोरे नसताना ४ दिवसात उघड करुन आरोपीस जेदबंद.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

गंभीर व क्लीष्ट खूनाचा गुन्हा कोणतेही धागेदोरे नसताना ४ दिवसात उघड करुन आरोपीस जेदबंद.


(स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची कारवाई.)

दिनांक १५/७/२०२४ रोजी लोणंद पोलीस ठाण्याचे हद्दीत रेल्वे स्टेशनचे गार्डनमध्ये एका ३० ते

३५ वयाच्या अनोळखी इसमास अज्ञात आरोपीने त्याचे डोक्यात फरशी व सिमेंट काँक्रिटचा ब्लॉक

डोक्यात मारुन त्याचा खून केल्याबाबत रेल्वे प्रोटेक्शन फोर्स विभागाचे अंमलदार विजय किशोर गार्डे

रा. रेल्वे कॉलनी लोणंद यांनी तक्रार दिल्याने लोणंद पोलीस ठाणे गुरनं ३१२ / २०२४ भारतीय न्याय

संहिता कलम १०३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा खूनाचा असल्याने श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती

आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा

सातारा यांना गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे अरुण देवकर पोलीस निरीक्षक यांच्या

अधिपत्त्याखाली सपोनि रोहित फार्णे व पोउनि अमित पाटील यांचे एक विशेष पथक तयार करुन तपासकामी

लोणंद पोलीस ठाण्यास पाठविण्यात आले होते.

सदर पथकाने लोणंद येथे जावून गुन्हयाच्या घटनास्थळास भेट दिली तेथील परिस्थितीची माहिती

घेतली. पोलीस निरीक्षक श्री अरुण देवकर यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे गुन्हयाचा तपास तांत्रिक पध्दत,

सीसीटीव्ही फुटेज, गोपनिय बातमीदार तसेच साखळी तपास पध्दतीचा अवलंब करुन ४ दिवस अहोरात्र लोणंद

व फलटण परिसरात कसोशिने तपास केला असून सदरचा गुन्हा परराज्यातील इसमाने केला असल्याचे निष्पन्न

करुन आरोपीस फलटण येथून ताब्यात घेण्यात आले आहे. तपासामध्ये सदरचा गुन्हा आरोपीने केला असल्याचे

सांगितले आहे. मयत इसम व आरोपी हे दोघे मुंबई येथे एका केटरर्सकडे कामास होते, त्याठिकाणी सुमारे ६

महिण्यापुर्वी दोघांच्यामध्ये पैशाच्या देवाण-घेवाणीच्या कारणावरुन वाद झाले होते त्या वादातूनच सदर आरोपी

याने मयत इसमाचा खून केला असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले असून सदर आरोपी यास पुढील

कारवाईकामी लोणंद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदर गुन्हा परराज्यातील एका इसमाने केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी हा उत्तरप्रदेशातील

मुळ रहिवासी आहे. मयत याची अद्याप ओळख पटली नाही आरोपी व मयत यांचा कोणत्याही प्रकारे राहण्याचा

अगर वावरण्याचा ठावठिकाणा नव्हता तसेच मयताच्या जवळ ओळख पटण्याचे कोणतेही दस्तऐवज मिळुन न

आल्याने सदर खूनाचा गुन्हा उघड करण्याचे मोठे आव्हान पोलीस यंत्रनेसमोर होते.

सदर कारवाईमध्ये श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस

अधीक्षक सातारा, यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, सहायक

पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे अंमलदार

अतिष घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण

फडतरे अमित माने, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, स्वप्निल कुंभार, प्रविण कांबळे, अरुण पाटील, ओंकार

यादव, मोहन पवार, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, वैभव सावंत, शिवाजी

गुरव, विजय निकम, फलटण शहर पोलीस ठाण्याचे अंमलदार सचिन फाळके व ऋषीकेश खरात यांनी

सहभाग घेतला असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक

सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments