Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना गतिमान पद्धतीने व पारदर्शकपणे जिल्ह्यात राबवावी जिल्हाधिकारी- गोविंद बोडके यांचे निर्देश.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना गतिमान पद्धतीने व पारदर्शकपणे जिल्ह्यात राबवावी जिल्हाधिकारी- गोविंद बोडके यांचे निर्देश. 



 पालघर दि 3 : राज्य शासनाची महत्त्वकांक्षी योजना मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण  योजना गतिमान पद्धतीने व पारदर्शकपणे जिल्ह्यामध्ये राबवावी असे निर्देश जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांना दिले. 

   जिल्हाधिकारी श्री. बोडके यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणाली द्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी श्री.

 बोडके बोलत होते. 

      यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप,प्रांत अधिकारी श्री. आगे पाटील  जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मल्लिनाथ कांबळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रवीण भावसार   तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र महिलांना या योजनेचा लाभ व्हावा यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रांत अधिकारी,तहसीलदार, गट विकास अधिकारी, नगरपालिका महानगरपालिका या कार्यालयाने या योजनेच्या माहितीविषयक बोर्ड,बॅनर किंवा होर्डिंग दर्शनी भागात लावावे. अर्ज कसा करावा ते अर्ज कोणाकडे द्यावा तसेच पात्र व अपात्र विषयीची माहिती स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी सर्व प्रांत अधिकारी, तहसीलदार महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, नगर परिषदेचे मुख्यअधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी प्राधान्याने या योजनेची कार्यवाही करावी असेहि निर्देश जिल्हाधिकारी श्री. बोडके यांनी दिले.

 मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना जिल्ह्यातील सर्व क्षेत्रांमध्ये पोहोचविण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा सेविका, महिला बचत गटाच्या कार्यकर्ता यांच्यामार्फत  गाव,पाडे या ठिकाणी जनजागृती करावी तसेच गावागावांमध्ये दवंडीच्या माध्यमातून या योजनेचा प्रसार करावा अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. बोडके यांनी संबंधित  अधिकारी वर्गाला दिल्या.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments