Type Here to Get Search Results !

बोरगाव पोलीस ठाणे हद्दीतुन नागरिकांचे गहाळ झालेले एकुण १२,५०,०००/-रुपये किंमतीचे ५५ मोबाईल गुन्हे प्रकटीकरण शाखेकडुन हस्तगत

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

बोरगाव पोलीस ठाणे हद्दीतुन नागरिकांचे गहाळ झालेले एकुण १२,५०,०००/-रुपये किंमतीचे ५५ मोबाईल गुन्हे प्रकटीकरण शाखेकडुन हस्तगत.


बोरगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोबाईल गहाळचे प्रमाण वाढल्यामुळे मा.समीर शेख पोलीसअधीक्षक सातारा, मा. आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक, सातारा, मा.राजीव नवले, पोलीस उपअधीक्षक, सातारा शहर विभाग सातारा यांनी सहा.पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे यांना नागरिकांचे हरविलेले मोबाईलचा शोध घेणेकामी सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे सहा.पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार यांना नागरिकांचे हरविलेले मोबाईलचा शोध घेणेकामी मार्गदर्शन करुन सुचना दिलेल्या होत्या.त्या अनुशंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेतील तांत्रिक पथकाचे पोलीस अंमलदार बाळासाहेब जानकर,केतन जाधव यांनी सी.ई.आय.आर. पोर्टल व इतर तांत्रिक माहिती प्राप्त करुन महाराष्ट्रातील :व इतर राज्यातील मोबाईल मिळालेल्या लोंकाशी नियमित संपर्क करुन चिकाटीने सदरची मोहिम राबविल्याने बोरगाव पोलीस ठाणे हद्दीतुन नागरिकांचे गहाळ झालेले एकुण १२,५०,०००/- रुपये किंमतीचे ५५ मोबाईल हस्तगत करण्यात यश आलेले आहे. सदरची मोहिम मा.समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, मा.आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक, सातारा, मा.राजीव नवले, पोलीस उपअधीक्षक, सातारा शहर विभाग सातारा यांचे मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारे सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे बोरगाव पोलीस ठाणेचे प्रभारी सहा.पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे यांनी सांगितले आहे.अशाप्रकारे बोरगाव गुन्हे प्रकटीकरण शाखेने सी.ई.आय. आर. पोर्टल व इतर तांत्रिक माहितीचे आधारे महाराष्ट्रातुन व इतर राज्यातुन नागरिकांचे गहाळ झालेले एकुण १२,५०,०००/- रुपये किंमतीचे ·५५ मोबाईल हस्तगत करुन मुळ मालकांना परत करण्यात आले आहेत.

सदरची कारवाई मा.समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, मा.आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक, सातारा, मा. राजीव नवले, पोलीस उपअधीक्षक, सातारा शहर विभाग सातारा यांचे मार्गदर्शनाखाली रविंद्र तेलतुंबडे, सहा.पोलीस निरीक्षक, पो.हे.कॉ.जयवंत बुधावले, पो.ना.प्रशांत चव्हाण, -सुनिल कर्णे पो.कॉ.बाळासाहेब जानकर, केतन जाधव, विशाल जाधव, सायबर पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार पो.कॉ.महेश पवार, यशवंतराव घाडगे, ओंकार डुबल यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments