Type Here to Get Search Results !

फलटण ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी,5ठिकाणी अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

 फलटण ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी,5 ठिकाणी अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई. 


मौजे निंभोरे या.फलटण जि.सातारा येथे दि.28/7/20240रोजी बेकायदेशिर देशी दारू विक्री करणाऱ्यावर फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे 

मिळालेल्या माहितीनुसार मौजे निंभोरे गावच्या हद्दीमध्ये आरोपी कुंदा अनिल चौधरी वय वर्ष 42  व सविता बापु घाडगे आणि विजय बापू कांबळे हे सर्व आरोपी राहणार निंभोरे हे स्वतः देशी दारू विक्री करत असल्याची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल रशिदा रियाज पठाण वय 32 वर्ष व हणमंत गुलाब दडस पोलीस कॉन्स्टेबल यांनी दिली असता फलटण ग्रामीण पोलिसांनी खबर मिळताच पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून गु.र. 754/2024 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशाच प्रकारे फलटण तालुक्यातील सांगवी गावामध्ये आरोपी अमोल ठकसेन बनसोडे व दादासो उर्फ मामडया बाबु मोरे यांच्यावर फलटण ग्रामीण पोलिसांनी अवैधरित्या दारू विक्री करताना छापा टाकून कायदेशीर कारवाई केलेली आहे असे एकुण 5 ठिकाणी फलटण ग्रामीण पोलिसांनी छापे टाकून कारवाई करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments