Type Here to Get Search Results !

साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागात लोक सहभागातून विद्यार्थी सहभोजनाने शैक्षणिक सप्ताहाची उत्साहात सांगता

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

साखरवाडी/ वैभव जगताप 

साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागात लोक सहभागातून विद्यार्थी सहभोजनाने शैक्षणिक सप्ताहाची उत्साहात सांगता.


 

साखरवाडी शिक्षण संस्थेच्या साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागात लोक सहभागातून विद्यार्थी सहभोजनाने शैक्षणिक सप्ताहाची उत्साहात सांगता झाली.महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने २२ ते २८ जुलै अखेर हा अभिनव उपक्रम आयोजित केला होता.शिक्षण , क्रीडा , सांस्कृतिक , पर्यावरण रक्षण , वृक्षारोपण आणि विद्यार्थी सहभोजन असे अनेक उपक्रम यामध्ये आयोजित केले.आज सांगतेच्या दिवशी लोक सहभागातून विद्यालयातील ५ वी ते १० वीच्या सुमारे १००० विद्यार्थ्यांना सहभोजन देण्यात आले.साखरवाडी परिसरातील अनेक व्यक्तींनी उत्तम सहकार्य केले.साखरवाडी मेडिकल असोसिएशन , बाजारपेठेतील व्यापारी , शेतकरी तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक बंधुभगिनिंनी मोलाची मदत केली.विद्यालयाच्या मुख्याध्यपिका सौ उर्मिलाताई जगदाळे आणि पर्यवेक्षक श्री तुळशीदास बागडे यांचे मार्गदर्शनाखाली विद्यालयातील सहाय्यक शिक्षक श्री हरिदास सावंत , रोहिदास गावित , कमलाकर गांगुर्डे , युवराज बोबडे , जयंत काळुखे , सुमित धायगुडे व सर्व शिक्षक बंधू भगिनींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.साखरवाडी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी माननीय श्री प्रल्हादरावजी साळुंखे पाटील , श्री धनंजय दादा साळुंखे पाटील , श्री राजेंद्र शेवाळे , श्री राजेंद्र भोसले , श्री कौशल भोसले तसेच शिक्षक पालक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक करून सर्वांना धन्यवाद दिले.

Post a Comment

0 Comments