Type Here to Get Search Results !

साखरवाडी विद्यालय माजी विद्यार्थी संघाकडून शालेय विद्यार्थ्यांना गणवेष वाटप.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

साखरवाडी/ वैभव जगताप 

साखरवाडी विद्यालय माजी विद्यार्थी संघाकडून शालेय विद्यार्थ्यांना गणवेष वाटप.   


      

 साखरवाडी विद्यालय माजी विद्यार्थी संघाकडून साखरवाडी विद्यालय  माध्यमिक विभागातील ६० विद्यार्थी विद्यार्थिनींना  शालेय गणवेशांचे वाटप विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ उर्मिलाताई जगदाळे , पर्यवेक्षक श्री तुळशीदास बागडे आणि सहाय्यक शिक्षक तथा माजी विद्यार्थी संघाचे कार्यवाह श्री हरिदास सावंत यांचे शुभहस्ते करण्यात आले.या उपक्रमासाठी साखरवाडी विद्यालय माजी विद्यार्थी संघाच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी आर्थिक सहकार्य केले.गेली सुमारे ५ वर्षे माजी विद्यार्थी संघाचे कार्यवाह श्री हरिदास सावंत यांचे प्रयत्नातून हा मोफत गणवेष वाटप उपक्रम साखरवाडी विद्यालयात राबवला जात असून अनेक गरजू विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ झाला आहे.

Post a Comment

0 Comments