सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
शाहुपुरी पोलिसांची कोप्टा कायदयान्वये अवैद्य व्यवसायावर कारवाई.
शाहुपूरी पोलीसांची मोठी कारवाई पोलीस ठाणे हद्दीत सातारा एस टी स्टँड, राजवाडा व शाहुपूरी परीसरात अवैध धंदे, अवैध गुटखा विक्री व कोप्टा कायदयान्वये कारवाई.
मा.पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल,
मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजीव नवले यांनी पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सावंत्रे यांना शाहुपुरी
पोलीस ठाणे हद्दीमध्ये विशेष मोहिम राबवुन अवैध धंदे, अवैध गुटखा विक्री करणा-या पानटप-यावर
कायदेशीर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे दि.30/07/2024 रोजी शाहुपूरी पोलीस ठाणेचे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती
श्रद्धा आमले,पोलीस उप-निरीक्षक श्री. कुमार ढेरे व पोलीस अंमलदार हद्दीतील सातारा एस. टी. स्टॅन्ड
परीसर व शाहुपुरी चौक परीसर या ठिकाणी पेट्रोलिंग करीत असताना अवैध गुटख विक्री करित असना-या
04 पानटप-याच्यावर कारवाई करून त्याच्याकडुन एकुन 7000/- रू. किंमतीचा अवैध गुटख जप्त
करून,त्याच्यावर गुन्हे दाखल करणेत आलेले आहेत. तसेच शाहुपुरी पोलस ठाणे हदिदतील राजवाडा,
शाहुपुरी व एस.टी. स्टॅड परीसरात सार्वजनीक ठिकाणी धुम्रपाण करणेस मनाई केलेली असताना सिगारेट
ओढताना एकुन 08 इसमांवर कायदेशीर कारवाई करणेत आली आहे. त्याचप्रमाणे शाहुपुरी पोलीस ठाणे
हददीतील राजवाडा बस स्टैंड व एस.टी. स्टॅड परीसरात अवैध मटका व्यावसाय करणा-या 02 अवैध
धंदयावर कारवाई करणेत आली आहे.
अशाप्रकारे शाहुपुरी पोलीस ठाणेचे पोलीस अधिकरी व अंमलदार यांनी गोपनीय माहितीचे
आधारे शाहुपुरी पोलीस ठाणेचे हदिदत 04 अवैध गुटखा विक्री करणा-या पानटप-या, 02 अवैध
धंदे व 08 इसमांवर कोप्टा कायदयाअन्वये कारवाई केली आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल
दलाल, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजु नवले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक
श्री.राजेंद्र सावंत्रे शाहुपुरी पोलीस ठाणे, म. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती श्रद्धा आमले, पोलीस उप-
निरीक्षक कुमार ढेरे व शाहुपुरी पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

Post a Comment
0 Comments