Type Here to Get Search Results !

शैक्षणिक सप्ताहाच्या सहाव्या दिवशी साखरवाडी विद्यालयात वृक्षारोपण

सह्याद्री निर्भिड न्यूज 

साखरवाडी/वैभव जगताप 

शैक्षणिक सप्ताहाच्या सहाव्या दिवशी साखरवाडी विद्यालयात वृक्षारोपण.


                             

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग आदेशित "शैक्षणिक सप्ताह " संपूर्ण राज्यामधील शाळांमध्ये सध्या चालू आहे.२२ जुलै २०२४ पासून प्रारंभ झालेल्या या शैक्षणिक सप्ताहात शिक्षणाबरोबरच क्रीडा , सांस्कृतिक , पर्यावरण रक्षण , वृक्षारोपण इत्यादी उपक्रमांचा अंतर्भाव आहे.सप्ताहाच्या आजच्या सहाव्या दिवशी साखरवाडी शिक्षण संस्थेच्या साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागात संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री धनंजय दादा साळुंखे पाटील यांचे शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ उर्मिलाताई जगदाळे , पर्यवेक्षक श्री तुळशीदास  बागडे , सहाय्यक शिक्षक श्री हरिदास सावंत , श्री गोपाळ कांबळे , श्री रोहिदास गावित , श्री युवराज बोबडे , श्री नितीन शिंदे ,  श्री जयंत काळोखे तसेच हरितसेना विभागप्रमुख सौ छाया पिंगळे , गर्ल गाईड विभागाच्या सौ विद्या रणवरे , एनसीसी विभागप्रमुख श्री भिमकांत कुंभार आणि एनसीसी , गर्ल गाईड चे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते!

Post a Comment

0 Comments