सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
फलटण तहसीलमध्ये लोकशाही दिन उत्साहात.
दि. १५/७/२०२४ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत लोकशाही दिन उत्साहात साजरा करण्यात आला हा प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी साजरा केला जातो. यामध्ये समाजातील तळागाळातील नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी हा लोकशाही दिन साजरा केला जातो यामध्ये प्रत्येक नागरिकांच्या समस्यांच्या संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना किंवा संबंधित अधिकारी हे समोर बोलावून त्याचे निवारण केले जाते. अथवा त्या प्रकारचा अध्यादेश काढला जातो. कारण काही प्रशासन आपल्या कर्तव्य पार पाडण्याच्या दृष्टीने प्रलंबित विषय ठेवतात त्याचे काही अनेक कारणे असतात परंतु पीडित नागरिक व जे काही नागरिकांच्या अडीअडचणी आहेत त्याचा लेखाजोखा अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून तहसील ऑफिसमध्ये लोकशाही दिना दिवशी मांडला जातो व त्याच दिवशी समोरा, समोर सगळे विषयावर चर्चा करून मार्गी लावले जातात.
यामध्ये निवेदनामध्ये घेतलेले विषय पुढीलप्रमाणे १) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी.
२) वाखरी ते वाखरी पाटी रिते वस्ती रोडमध्ये मोठे खड्डे पडलेले आहेत त्याची त्वरित करण्यात यावी अशी बांधकाम विभागास विनंती करण्यात आलेली आहे.३) शाळा महाविद्यालय सुरू होऊन जवळपास एक महिन्याचा रात्री मुलींना मोफत एसटी पास मिळणार नाहीत तरी ते त्वरित देण्यात यावेत ४) साथीच्या आजाराच्या अनुषंगाने फलटण तालुक्यातील सर्व गावांमध्ये औषध फवारणी करून आरोग्य विभागाने पिण्याच्या पाण्याची तपासणी करून त्याचा अहवाल प्रत्येक ग्रामपंचायतीस सादर करण्यात५) पांढऱ्या शिधापत्रिका धारकांस आधार कार्ड लिंक करून घेण्यात यावे ही विनंती ६) नीरा उजवा कालव्यावरील काळज-तडवळे-मुरुम रोडवरील तडवळे गावा नजीक असलेला साल:१९१९ मधील पुलास १०५ वर्षे पूर्ण झालेली असून त्या पुलास तडे गेलेले आहेत तरी तो पुल वाहतुकीसाठी धोकादायक झालेला असून त्या फुलाचे पुनर्बांधणी त्वरित करण्यात यावी अशा प्रकारचे अनेक प्रश्नांचे निवारण करण्यात आले याप्रसंगी नायब तहसीलदार एन डी काळे, दातीरे परितोष पीएसआय, नगरपंचायत अधिकारी माहात, बी.डी.ओ. बोडरे,संजय गांधी निराधार योजना विभागाचे अव्वल कारकून किशोर काकडे व अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष -तानाजी सोडमिसे, उपाध्यक्ष -किसण ढेकळे, संघटक-सदाशिव मोहिते, सातारा जिल्हा सचिव -आप्पासाहेब पिसाळ, कोषाध्यक्ष -राजन भोसले, सहसचिव-मारूती पिसाळ, फलटण तालुका कार्यकारणी सदस्य-वैभव जगताप इत्यादी उपस्थित होते

Post a Comment
0 Comments