Type Here to Get Search Results !

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे जिल्ह्यात दाखल.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे जिल्ह्यात दाखल.



20 जुलैपासून नागरिकांसाठी प्रदर्शन खुले

वाघनखे सातारा जिल्ह्यात सात महिने असणार- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी.

 सातारा (दि. 17 जि.मा.का) छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे जिल्ह्यात दाखल झाली असून शिवशस्त्रशौर्यगाथा या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दिनांक 19 जुलै रोजी दुपारी १२.१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय येथे होणार आहे. 


शनिवार दिनांक 20 जुलैपासून  हे प्रदर्शन सर्व नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात येणार आहे. वाघनखे सात महिने सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात सर्व दिवशी सकाळी ११ते सायंकाळी ५ या वेळेत नागरिकांना पाहण्यासाठी खुले राहील . याची तिकिटे ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने नागरिकांना उपलब्ध करून घेता येतील. हे प्रदर्शन एकावेळी दोनशे लोकांना पाहता येतील येईल.  दिवसभरातून यासाठी चार स्लॉट उपलब्ध करून देण्यात आले असून यामध्ये पहिला प्लॉट विद्यार्थ्यांसाठी मोफत राहणार आहे. तर दुपारी १ वाजेच्या पुढील उर्वरित तीन स्लॉट हे नागरिकांना नाममात्र शुल्क आकारून पाहण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत. या प्रदर्शनाचा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा , असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments