सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
मतदार यादीतील नोंदणी, वगळणी, शुध्दीकरणाबाबत सुचनांसाठी निवडणूक शाखेशी संपर्क साधावा- जिल्हधिकारी जितेंद्र डुडी
सातारा 23 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 01 जुलै 2024 या अहंता दिनांकावर (Quilifying Date) आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे . त्या अंतर्गत विभागीय आयुक्त पुणे तथा मतदार यादी निरीक्षक सातारा जिल्ह्यास दिनांक 25 जुलै रोजी भेट देणार आहेत. त्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील सर्व विद्यमान खासदार, आमदार तसेच मान्यता प्राप्त राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांची बैठक गुरुवार दिनांक 25 जलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सभागृह (Conference Hall) येथे सकाळी 10 वा आयोजित केली आहे. तसेच सदर बैठकीस सर्व मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे निर्देशानुसार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे अनुषंगाने विभागीय आयुक्त, पुणे मतदार यादी व मतदान केंद्र सुसूत्रीकरणाच्या अनुषंगाने आढावा घेणार आहेत. मतदार यादीतील नोंदणी, वगळणी इत्यादी तसेच मतदार याद्यांचे शुध्दीकरण याबाबत मतदार, नागरिक व राजकीय प्रतिनिधी यांना काही सुचना सादर करावयाच्या असतील तर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments