सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन.
सातारा दि. 23 (जि.मा.का.) - २५वा कारगिल विजय दिवस (रौप्य महोत्सवी वर्ष) सातारा येथे श्री. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सातारा येथील स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह, जिल्हा परिषद, सातारा येथे दिनांक २६ जुलै २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता साजरा होणार आहे. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्यातील, भारतमातेच्या रक्षणार्थ कारगिल युध्दामध्ये हौतात्म्य पत्करलेल्या जवानांच्या वीरपत्नी/वीरमाता/वीरपिता तसेच या युध्दामध्ये अपंगत्व आलेल्या आणि शौर्य पुरस्कारधारक यांचा मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
तरी याप्रित्यर्थ जिल्हयातील सर्व वीरपत्नी, वीर माता-पिता, माजी सैनिक, आणि माजी सैनिकांचे अवलंबितांना, या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याबाबत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी आवाहन केले आहे.

Post a Comment
0 Comments