सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/वैभव जगताप
दि एम्रल्ड हाईट्स प्रि स्कूल ॲकॅडमी साखरवाडी शाळेमध्ये पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
फलटण तालुक्यातील दि एम्रल्ड हाईट्स प्रि स्कूल अँड ॲकॅडमी साखरवाडी शाळेमध्ये शुक्रवार दिनांक 05/07/2024 रोजी पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली दत्तात्रय शिंदे मॅडम उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी खूप छान तयार होऊन आले होते.मुली काटपदर साडी, परकर - पोलक ,तुळस तर मुले पांढरे धोतर, पांढरा शर्ट ,टोपी, टाळ असे तयार होऊन आले होते.सर्वप्रथम प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते पालखीचे पूजन व आरती करण्यात आली. त्यानंतर मुलांची दिंडी काढण्यात आली.सर्व मुले- मुली टाळ वाजवत,भजन गात सुंदर आशा मृदुंगाच्या तालात चालत होते. विविध प्रकारचे खेळ घेण्यात आले व सर्वांनी याचा भरभरून आनंद घेतला.अशाप्रकारे पालखी सोहळा उत्सवात साजरा करण्यात आला.यावेळी मुख्याध्यापिका अंजली दत्तात्रय शिंदे मॅडम ,इन्चार्ज शितल कुंभार व मोनाली कुलकर्णी,शिवगंगा पवार, वर्षा खोमणे, पल्लवी भापकर,शिरीन मुलाणी,अफसाना सय्यद, तेजश्री सोनटक्के,विद्या भिसे,दिपाली चव्हाण,सुषमा गायकवाड सर्व विद्यार्थी वर्ग, शिक्षकवृंद उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments