सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
श्री. संत ज्ञानेश्वर महाराज (माऊली) पालखी सोहळा २०२४ करीता सातारा पोलीस दल सज्ज.
असून सोहळा सुरक्षित पार पाडण्याकरीता पोलीस दलाकडून डिजीटल उपाय योजना लागू.
सालाबाद प्रमाणे दि.०६/०७/२०२४ ते दि.११/०७/२०२४ रोजीचे कालावधीमध्ये सातारा जिल्हयातून
श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे लोणंद, तरडगाव, फलटण, बरड या मार्गाने मार्गक्रमन होणार आहे.
दि.०६/०७/२०२४ रोजी निरा पुल येथे श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सातारा जिल्हयात आगमन होणार
असून नमुद पालखी सोहळयास सुमारे ५ ते ६ लाख वारकरी भाविक उपस्थित राहणार आहेत.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा
यांनी श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयास येणाऱ्या वारकरी व भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस
बंदोबस्ताचे विशेष प्रकारे नियोजन केले आहे. नमुद पालखी सोहळयाकरीता पोलीस उपअधीक्षक, पोलीस
निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक पदाचे एकूण ८० अधिकारी व ८०० पोलीस
अंमलदार यांची बंदोबस्ताकरीता नियुक्ती करण्यात आलेली आहे.
श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा बंदोबस्ताकरीता बहुसंख्य पोलीस अधिकारी व अंमलदार
यांची नियुक्ती करण्यात येते. बंदोबस्ताकरीता बहुसंख्येने हजर असणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार
यांच्या कर्तव्याचे नियोजन करण्याकरीता मोठया प्रमाणावर मनुष्यबळ खर्ची पडते, तसेच पालखी
सोहळयामध्ये मोठया प्रमाणावर वारकरी / भाविक यांची गर्दी असते यामध्ये पोलीस अंमलदार यांची हजेरी
घेण्यास खुप वेळ वाया जातो. या सारासार गोष्टींचा विचार करुन वेळेचा अपव्यय टाळण्याकरीता श्री. समीर
शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी पोलीस
बंदोबस्ताचे योग्य प्रकारे नियोजन करण्याकरीता डिजीटल अॅप तयार करण्यात आले असून त्याच्या अधारे
पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या कर्तव्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्याकरीता तयार करण्यात आलेले डिजीटल अॅपची लिंक सर्व
पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पाठविण्यात आली असून, त्या लिंकच्या आधारे पोलीस अधिकारी व
अंमलदार यांनी हजर असणाऱ्या ठिकाणी सेल्फी काढल्यानंतर त्या ठिकाणचा Latitude (अक्षांश),
Longitude (रेखांश) च्या माहितीची नोंद होणार आहे. तद्नंतर सेल्फी व जिओ टॅगिंगच्या माहितीची
तुलना होवून नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार बंदोबस्ताचे ठिकाणी हजर असल्याबाबतचा मेसेज त्याचे
मोबाईल नंबरवर येणार आहे.
वरील प्रणालीमुळे हजेरी प्रक्रियेत पारदर्शकता येणार असून यामुळे श्री. संत ज्ञानेश्वर महाराज
पालखी सोहळयाच्या बंदोबस्ताचे उत्कृष्ठ व प्रभावीपणे नियोजन करता येईल. या अभिनव डिजीटल
उपक्रमामुळे पालखी सोहळयाच्या मार्गावर पोलीस अधिकारी व अंमलदार यांची हजेरी राहून वारकरी व
भाविक यांच्या सुरक्षिततेची नियोजित व्यवस्था राखता येणार आहे.
त्याचप्रमाणे श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा बंदोबस्तकरीता आणखी खालील
प्रमाणे उपाय योजना करण्यात आलेल्या आहे.
१) ड्रोन कॅमेरे :- पालखी मार्गावर सतत नजर ठेवण्याकरीता ड्रोन कॅमेरे तैनात करण्यात आले असून
यामुळे मोठया गर्दीवर नियंत्रण ठेवता येणार आहे.
२) सी. सी. टी. व्ही पालखी मार्गावर विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून,
पालखी सोहळयामध्ये घडणाऱ्या अनुचित प्रकारांना त्वरीत प्रतिसाद देता येणार आहे.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा
यांनी वरील प्रमाणे श्री. संत ज्ञानेश्वर महाराज (माऊली) पालखी सोहळा बंदोबस्ताचे नियोजन केले असून
पालखी सोहळा सुरक्षित पार पाडण्याकरीता सातारा पोलीस दल सज्ज असल्याचे श्री. समीर शेख पोलीसअधीक्षक सातारा यांनी सांगीतले आहे.
आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇👇👇👇
https://chat.whatsapp.com/EAcU5UeglYl6sOte0VCfZL
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments