सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/ वैभव जगताप
पंढरीची सायकल वारी...!
श्री. स्वामी समर्थ सायकल क्लब, साखरवाडी आयोजित पंढरीची सायकल वारी, मौजे साखरवाडी, फलटण जि.सातारा येथील साखरवाडी-पिंपळवाडी ते पंढरपूर सायकलवारी वर्ष २ रे दिनांक ६ जुलै २०२४ रोजी पार पडली.
दि.६/७/२०२४ रोजी पहाटे ५ वाजता पंढरीची सायकल वारी परिक्रमेला सुरुवात करून फक्त दोन ते तीन ठिकाणी विसावा घेत दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास चंद्रभागेच्या तीरी विठुरायाच्या चरणी नतमस्तक झाले.व विठु माऊलींची २५८ कि.मी.ची परिक्रमा पूर्ण केली.अशाच प्रकारे पुढील वर्षी नवा संकल्प देहू,आळंदी ते पंढरपूर अशी पंढरीची सायकल वारी करण्याचा आहे.
साखरवाडीतील सायकल प्रेमींनी यामध्ये सहभाग घेतला यामध्ये राजेंद्र इमड़े, सोमनाथ माने, प्रदीप (पिंटू शेठ) भोसले,गोपाळ कांबळे ,अनिल जाधव, रविंद्र संकपाळ, तानाजी पवार हे सायकल प्रेमी उत्सुकतेने सहभागी झाले.
आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇👇👇👇
https://chat.whatsapp.com/EAcU5UeglYl6sOte0VCfZL
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121


Post a Comment
0 Comments