सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
संवाद वारी उपक्रम फलटणमध्ये.
*सातारा दि. ८ (जि.मा.का.) - शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारा संवाद वारी उपक्रम फलटण शहरात दाखल झाला आहे. उद्या दि. ९ रोजी दिवसभर हा उपक्रम फलटण शहरात सुरू राहणार आहे.
शहरात प्रांत अधिकारी कार्यालयाच्या आवारात शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे प्रदर्शन उभारण्यात आले आहे. तर शहराच्या विविध भागात विशेषतः पालखी तळ व आजूबाजूच्या परिसरात चित्ररथ, पथनाट्य, लोककला आणि एल इ डी वाहनाच्या माध्यमातून योजनांविषयी माहिती नागरिक व वारकरी यांना घेता येणार आहे.
शासनाच्या विविध योजना आणि जन कल्याणकारी निर्णयांची माहिती सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावतीने संवाद वारी उपक्रम राबवण्यात येत आहे.
आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇👇👇👇👇
https://chat.whatsapp.com/EAcU5UeglYl6sOte0VCfZL
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121


Post a Comment
0 Comments