सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/ वैभव जगताप
साखरवाडी खामगाव हद्दीतील अवैध्य व्यवसायावर फलटण ग्रामीण पोलिसांचा हातोडा.
मौजे साखरवाडी व खामगाव ता.फलटण जि.सातारा हद्दीत जे काही अवैधरित्या अवैद्य व्यवसाय चालू आहेत मटका, हातभट्टी दारू विक्री जुगार यांच्यावर फलटण ग्रामीण पोलिसांनी दि.12/7/2024 रोजी धडक छापे टाकून कायदेशीर कारवाई केलेली आहे. तसेच खामगाव हद्दीतील अजय हनुमंत जाधव वय वर्ष 29 रा खामगाव ता फलटण जि.सातारा यास हातभट्टी दारू विक्री करताना रंगेहात पकडले असता त्याच्यावरती गुन्हा रजिस्टर प्रमाणे 707 /2024 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65 ई प्रमाणे फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत गुलाब दडस वय वर्ष 32 यांनी कायदेशीर कारवाई केलेली असून याचा पुढील अधिक तपास सहाय्यक फौजदार पी.बी. हजारे हे करीत आहेत.
आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇👇👇👇
https://chat.whatsapp.com/EAcU5UeglYl6sOte0VCfZL
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments