Type Here to Get Search Results !

स्व. शिवाजीराव देसाई यांच्या 38 व्या पुण्यतिथी निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा पोलीस अधीक्षक श्री.समीर शेख यांच्या हस्ते सत्कार

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

स्व. शिवाजीराव देसाई यांच्या 38 व्या पुण्यतिथी निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा पोलीस अधीक्षक श्री.समीर शेख यांच्या हस्ते सत्कार.


विद्यार्थ्यांनी त्यांना आवड असणाऱ्या क्षेत्रात करिअर करावे- पोलीस अधिक्षक समीर शेख.


सातारा , दि. 12 (जि.मा.का.) – विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे असे प्रतिपादन पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी केले. मरळी, दौलतनगर, ता. पाटण येथे स्व. शिवाजीराव देसाई यांच्या 38 व्या पुण्यतिथी निमित्त 10 वी व 12 वी मध्ये तालुक्यात प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या तसेच प्रत्येक केंद्रावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी श्री. शेख बोलत होते.

यावेळी कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई, पाटणचे प्रांताधिकारी सुनिल गाढे, तहसिलदार आनंद गुरव यांच्यासह नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.

शिक्षणानंतर समाजासाठी काही करण्याची भावना विद्यार्थ्यांनी जपावी असे सांगून श्री. शेख म्हणाले, आपल्या भागाच्या विकासासाठी आपण काय करु शकतो याचा विचारही विद्यार्थ्यांनी करावा. त्यांना मोठे करणाऱ्या भागाचा विकास झाला पाहिजे, असा ध्यास प्रत्येकाने बाळगल्यास राज्याचा चांगला विकास शक्य आहे.

विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी जपावी असे लोकनेते  बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री देसाई म्हणाले. यावेळी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, पुस्तक व रोखरक्कम देऊन गौरव करण्यात आला. तसेच मुकबधीर विद्यार्थी व विद्यार्थिंनींना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.

आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://chat.whatsapp.com/EAcU5UeglYl6sOte0VCfZL

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments