Type Here to Get Search Results !

संकल्प अवयवदानाचा

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

संकल्प अवयवदानाचा..!



*पवित्र तो देह वाणी पुण्यवंत* या जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या उकतीप्रमाणे कै गिरीश विजयराव राजेनिंबाळकर यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या कुटुंबाने अवयव दानाचा संकल्प करून जवळपास 6 रुग्णाचे प्राण वाचवण्याचे पवित्र काम केले आहे.

मौजे वडगाव निंबाळकर ता.बारामती जि.पुणे येथील श्री. विजयराव राजेनिंबाळकर यांचे चिरंजीव व विठ्ठलराव गेणबा खराडे व संपतराव गेणबा खराडे यांचे नातू व सर्व परिवारातील कै गिरीश विजयराव राजेनिंबाळकर यांचे वयाच्या 44 व्या वर्षी दि. 12/07/2024 रोजी रुबी हॉल, पुणे येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते, त्यानंतर त्यांच्या संपूर्ण परिवाराने  ऐतिहासिक असा त्यांच्या अवयवदानाचा निर्णय घेऊन 6 रुग्णांचे प्राण वाचवण्याचं अत्यंत पुण्यवान काम केल आहे, या त्यांच्या निर्णयामुळे समाजाच्या सर्व स्तरातून त्यांच्या परिवाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे, त्यांच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे 

शोकाकुल- समस्त राजेनिंबाळकर, खराडे, रणनवरे, शितोळे परिवार

Post a Comment

0 Comments