Type Here to Get Search Results !

1 जुलैपासून सर्वर प्रॉब्लेममुळे दाखले वितरित करण्यास अडचणी - तहसीलदार डॉ.अभिजीत जाधव

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

1 जुलैपासून सर्वर प्रॉब्लेममुळे दाखले वितरित करण्यास अडचणी - तहसीलदार डॉ.अभिजीत जाधव 


    फलटण  : शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना गेल्या 10/12  दिवसात सर्वर प्रॉब्लेम मुळे  दाखले वितरित करण्यास अडचणी येत असून  महसूल कर्मचारी रात्रंदिवस  दाखले वितरित करण्याचे काम सुरू असल्याची माहिती फलटणचे तहसीलदार डॉ.अभिजीत जाधव यांनी दिली.

 

   नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी आवश्यक असलेले जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, आर्थिक दुर्बल घटकांचे प्रमाणपत्र, एस. ई. बी. सी. दाखले, नॉन क्रिमीलेअर यासह लाडकी बहिण योजनेमुळे राज्यात सर्वत्र दाखल्यांचे अतिरिक्त कामकाज चालू असल्याने  संपूर्ण राज्यात server down राहत आहे व त्यामुळे कामकाज प्रलंबित राहत आहे शैक्षणिक दाखले  येण्याचे प्रमाण जास्त असून  दाखले वितरित करण्याचे पोर्टल हे खूप मंद गतीने सुरू 

तथापी तहसील कार्यालयाने दाखल्यांचे नियोजन केले आहे. सर्व कागदपत्र पूर्तता केलेले दाखले हे first in first out स्वरूपातच निर्गत केले जात आहेत यासाठी कोणत्याही सेतू केंद्रास preference दिला जात नाही तथापि सेवा हमी कायद्यानुसार उत्पन्न दाखला निर्गत करण्यासाठी 15 दिवस मुदत आहे आणि server down असूनही दाखला लवकरात लवकर  दाखला सोडण्याचे प्रयत्न सुरु  आहेत .  सदर प्रलंबितता कमी करण्याचे आणि दाखले मिळण्याचा कालावधी अजून कमी करण्याचे नियोजनसुरु आहे.तरीही कोणास शैक्षणिक कामी अर्जंट दाखला हवा असल्यास मला अथवा नायब तहसीलदार श्री नामदेव काळे यांना थेट संपर्क करावा अशी माहिती फलटण तहसीलदार अभिजीत जाधव यांनी दिली.

Post a Comment

0 Comments