सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
दै. रोखठोकच्या वर्धापन दिनास समीर वानखेडे, क्रांती रेडकर उद्या रविवारी दि.१४/७/२०२४ रोजी कोल्हापूर मध्ये...
कोल्हापूर येथून प्रसिद्ध होणाऱ्या "रोखठोक व्हिजन" दैनिकाचा प्रथम वर्धापन दिन आज रविवारी विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आयपीएस अधिकारी समीर वानखेडे आणि सिने अभिनेत्री क्रांती रेडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
कोल्हापूर येथील दसरा चौकातील छत्रपती शाहू स्मारक भवन येथे दुपारी १२ वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी दैनिक रोखठोकच्या वर्धापन दिन पुरवणी विशेषांकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार आहे . यावेळी कर्तुत्वान व्यक्तींचा पुरस्कार वितरण सोहळा सुद्धा आयोजित करण्यात आला आहे.याप्रसंगी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य संपादक सुरेश माडकर यांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments