सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/ वैभव जगताप
साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागात शैक्षणिक सप्ताहाची प्रभावी अंमलबजावणी.
महाराष्ट्र शासन शालेय विभागाने यावर्षी शैक्षणिक सप्ताह असा एक अभिनव उपक्रम आयोजित केला असून महाराष्ट्रातील सर्व शाळांमधून २२ जुलै ते २८ जुलै २०२४ अखेर या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे.शिक्षण, कला,क्रीडा,पर्यावरण पूरक उपक्रम अशा अनेक बाबींनी हा सप्ताह साजरा होत आहे.साखरवाडी ता.फलटण जि.सातारा शिक्षण संस्थेच्या साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागातही या सप्ताहाची अत्यंत प्रभावी आणि उत्साहपूर्ण सहभागातून अंमलबजावणी सुरू आहे.अगदी पहिल्या दिवसापासून विविध विषय उपक्रम, सर्व विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा , सांस्कृतिक कार्यक्रम , वृक्षारोपण , सर्व विद्यार्थ्यांना भोजन असे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शासनाच्या अपेक्षेप्रमाणे या सर्व उपक्रमांसाठी लोक सहभाग ही घेतला जात आहे.साखरवाडी परिसरातील अनेक कलाकारांनी यानिमित्ताने आपली कला सादर करून सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत वाढवली.शालेय विद्यार्थ्यांनीही कार्यक्रम सादर केले.सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी लोक सहभागातून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सहभोजन दिले जाणार आहे. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ ऊर्मिलाताई जगदाळे , पर्यवेक्षक श्री तुळशीदास बागडे यांचे मार्गदर्शनाखाली विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी या सप्ताहाच्या प्रभावी नियोजनासाठी उत्तम सहकार्य करत असून परिसरातही या शासकीय उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Post a Comment
0 Comments