Type Here to Get Search Results !

अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तीचेवर अत्याचार केलेल्या नराधमाच्या लोणंद पोलीसांनी आवळल्या मुसक्या

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तीचेवर अत्याचार केलेल्या नराधमाच्या लोणंद पोलीसांनी आवळल्या मुसक्या .


लोणंद पोलीस ठाणे हददीत दि. ०६.०७.२०२४ रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे

पालखीचे दर्शनासाठी आलेल्या भाविकामधील एका कुटूंब पती पत्नी व एक १३ वर्षाची लहान मुलगी

असे दर्शन घेवुन दिनांक ०७/०७/२०२४ रोजी पहाटे १.३० वा घरी जात असताना त्यांना पहाटे लिफट

देण्याच्या बहाण्याने बजाज पल्स मोटार सायकल वरुन एका इसमाने त्यांना मी त्याच भागात जात आहे

तुम्हाला सोडतो असे सांगुन त्यातील मुलगी व तीची आई यांना मोटार सायकल वर बसवुन पाडेगाव

टोल नाका येथे गेल्यावर महीलेस खाली उतरवुन मुलीस घेवुन पोबारा केला त्याच वेळी मुलीचे आई

वडीलांचे लक्षात आलेवर त्यांनी पोलीस स्टेशनला अल्पवयीन मुलीस वाईट हेतुने पळवुन नेलेबाबत

गुन्हा दाखल केला होता.

सदर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेवुन मा. पोलीस अधीक्षक सो सातारा समीर शेख, मा. अप्पर

पोलीस अधीक्षक साो. आंचल दलाल मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल धस सो, यांनी

लोणंद पोलीस स्टेशन कडील गुन्हे प्रकटीकरण पथकास अल्पवयीन मुलीचा व आरोपीचा शोध

घेणेकरीता सुचना दिल्या होत्या. शोध सुरु असताना अल्पवयीन मुलीस दिनांक ०७/०७/२०२४ रोजी

दुपारी आरोपीने पाडेगाव ता. खंडाळा गावचे हद्दीत रोडवरील रसवंतीजवळ आडमार्गाने येवुन सोडुन

पसार झाला होता. त्यानंतर सदर बातमी मिळताच पिडीतेस अज्ञात आरोपी बाबत विचारपुस केली परंतु

सदर पिडीत मुलगी ही अतिशय घाबरलेली होती व कोणतीही घटना सांगणेच्या परिस्थितीत नव्हती.

अज्ञात आरोपीने तीला घेवुन जाताना आडमार्गचा वापर करुन तीचेवर अत्याचार केला व केलेल्या

अत्याचाराबाबत जर कोणास काही एक सांगीतले तर तीला व तीचे घरातील लोकांना जिवे मारण्याची

धमकी दिली त्यामुळे पिडीतेने घाबरुन दोन दिवस काही एक सांगीतले नाही. दरम्यान कालावधीत

मा. पोलीस अधीक्षक सो सातारा समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक साो. आंचल दलाल मॅडम,

मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल धस सो, यांनी अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी लोणंद

पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखा सातारा, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन व फलटण शहर पोलीस

स्टेशन कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची वेगवेगळी पथक तयार करुन त्यांना मार्गदर्शन करुन

आरोपीचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या. सदर सर्व पथकांने सीसीटीव्ही फुटेज व गोपणिय माहीतीचे

आधारे अतोनात प्रयत्न केले परंतु पिडीत मुलीस अज्ञात आरोपीने आडमार्गाने नेले असल्यामुळे तीला

काहीही उपयुक्त माहिती सांगता येत नव्हती.

दिनांक १४/०७/२०२४ रोजी लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी श्री. सुशिल भोसले, सहाय्यक

पोलीस निरिक्षक व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनीसदर पिडीतेचे व्यवस्थितरित्या समुपदेशन

करुन तीला विश्वासात घेवुन विचारपुस केली व वेगवेगळे बारचे फोटो दाखविले असता त्यातील एक

Scanned with OKEN Scanner

हॉटेल ओळखीचे दिसल्याने त्यामधील फुटेजची पाहणी करुन अज्ञात आरोपीची ओळख पटली त्यानंतर

वरिष्ठांचे मार्गदर्शनावरुन सदर अज्ञात आरोपीस लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. सुशिल

भोसले, सहाय्यक पोलीस निरिक्षक व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार पोहवा सर्जेराव सुळ २२६०,

संतोष नाळे १२००, विठ्ठल काळे १४८३, केतन लाळगे ८१८, गोविंद आंधळे ११७०, सुनिल नामदास

१४३१, अभिजित घनवट २३९५ यांनी साफळा रचुन आरोपीचा पाठलाग करुन सदर आरोपीस ताब्यात

घेतले. सदर आरोपी हा एनटी समाजाचा असुन पिडीत मुलगी ही एसटी समाजाची असल्याने सदर

गुन्हयात अॅट्रासिटी कलमान्वये वाढ करण्यात आली असुन सदर गुन्हयाचा तपास श्री. राहुल घस

उपविभागिय पोलीस अधिकारी फलटण हे करीत आहेत. सदर आरोपीस न्यायालयात भेटविले असता

दिनांक २२/०७/२०२४ रोजीपर्यंत त्यास पोलीस कस्टडी मिळाली आहे.

सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधीक्षक सो सातारा समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक

राहुल धस हे

साो. आंचल दलाल मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली मा. उपविभागीय पोलीस अधीकारी साो.

करीत असुन सदर कारवाईमध्ये लोणंद पोलीस स्टेशनचे श्री. सुशिल भोसले, सहाय्यक पोलीस

निरिक्षक, श्री. शिवाजी काटे पोलीस उपनिरीक्षक व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार पोहवा सर्जेराव

सुळ, संतोष नाळे, विठ्ठल काळे, केतन लाळगे, गोविंद आंधळे, सुनिल नामदास, अभिजित घनवट,

राहुल मोरे, चालक यादव सपोफौ महेंद्र सपकाळ, पोहवा नितीन भोसले तसेच स्थानिक गुन्हे शाखा

सातारा, फलटण ग्रामीण व फलटण शहर पोलीस स्टेशन यांचेकडील अधिकारी व अंमलदार यांनी

सदर कारवाई मध्ये सहभाग घेतला असुन मा. पोलीस अधिक्षक सो सातारा यांनी विषेश अभिनंदन केले

आहे.

Post a Comment

0 Comments