सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/ वैभव जगताप
श्री.ग.वि.भोसले प्रतिष्ठान साखरवाडी, यांच्यावतीने पाच हजार वारकऱ्यांना अन्नदान..!
परमात्मा पांडुरंग श्री. विठुरायाच्या भेटीला निघालेल्या संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे मंगळवार दिनांक ०९/०७/२०२४ रोजी आपल्या भागात आगमन झाले.या सर्व दिंड्यांचे स्वागत , सत्कार व अन्नदान करण्याचे पुण्यकर्म आपण सर्वजणांनी मिळून करण्याचे भाग्य आम्हाला लाभले.प्रत्येक दिंडीतील विणेकर वारकऱ्यांना पुष्प,श्रीफळ, प्रत्येकी १ किलो साखर व सुमारे ४००० वारकरी माऊलीना सकाळचा नाष्टा व चहा वाटप करण्याचे नियोजन " श्री ग.वि.भोसले प्रतिष्ठान - साखरवाडी" यांचे मार्फत केले गेले .मंगळवार दिनांक ०९/०७/२०२४ रोजी पहाटे ६ ते सकाळी १० या वेळेत बडेखान येथे आपण सारेजण मिळून हा उपक्रम करण्याचे योग्य नियोजन केले गेले आहोत. आपणा सर्वांच्या सुपरिचित असलेले श्री. ग . वि.भोसले सर हे आपल्या साखरवाडी परिसरातील एक आदर्श शिक्षक ! सरदार वल्लभभाई हायस्कूल मध्ये उपशिक्षक ते प्राचार्य असा त्यांचा शैक्षणिक प्रवास सर्वांनी जवळून पाहिला आहे.हजारो आदर्श विद्यार्थी त्यांनी घडवले. सध्या ते सेवानिवृत्ती आयुष्य जगत असताना त्यांनी घालून दिलेले आदर्श पुढे तसेच चालू ठेवण्याचा उद्देश मनी धरून हे प्रतिष्ठान साखरवाडी परिसरात अनेक सामाजिक उपक्रम, धार्मिक उपक्रम , राष्ट्रीय उपक्रम राबवित आहे.त्याचाच हा एक भाग! श्री भोसले सरांवर प्रेम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी व इतर सर्व बंधू भगिनींनी या कार्यात व आत्ताच्या या उपक्रमात आनंदाने सहभागी होवून आमचा आनंद द्विगुणित करण्यासाठी १) श्री ग. वि.भोसले प्रतिष्ठान , साखरवाडी २) आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रुप , साखरवाडी ३) श्री नवरात्र शारदोत्सव मंडळ , साखरवाडी ४) श्री स्वामी समर्थ सेवेकरी मंडळ, साखरवाडी श्री. सचिन गणपत भोसले -अध्यक्ष - श्री ग. वि.भोसले प्रतिष्ठान , साखरवाडीश्री. संजय गणपत भोसले -उपाध्यक्ष - श्री ग. वि .भोसले प्रतिष्ठान , साखरवाडी.श्री हरिदास सावंत-सचिव - श्री ग.वि.भोसले प्रतिष्ठान , साखरवाडी, तसेच प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.असाच उपक्रम दरवर्षी करण्याचा संकल्प केला असुन तो संकल्प आपण सर्वांच्या आशिर्वादाने वर्ष नव वर्ष पूर्ण व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना श्री.ग.वि.भोसले प्रतिष्ठान यांच्यावतीने करण्यात आली.
आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.👇👇👇👇👇👇👇👇
https://chat.whatsapp.com/EAcU5UeglYl6sOte0VCfZL
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments