Type Here to Get Search Results !

कराड पोलिसांनी तडीपार गुन्हेगारास पिस्टल व जिवंत काडतुसासह सापळा रचुन पकडले

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

कराड पोलिसांनी तडीपार गुन्हेगारास पिस्टल व जिवंत काडतुसासह सापळा रचुन पकडले.


 

उपविभागीय पोलीस अधिकारी कराड यांचे पथकाची कारवाई

रेकॉडवरील तडीपार गुन्हेगारास पिस्टल व जिवंत काडतुसासह सापळा रचुन पकडले

सातारा जिल्हयामध्ये गुन्हेगार व त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. समीर

शेख व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांनी सक्त सुचना केल्या आहेत. व सातत्याने ठोस पावले

उचचली आहेत. सातारा जिल्हयातील गुन्हेगारी नियंत्रणाकरीता अवैध शस्त्र खरेदी-विक्री व बाळगणाऱ्यांविरुध्द

विशेष मोहिम सुरुवातीपासुन राबविली आहे.

दि.२३/०७/२०२४ रोजी मा. श्री. अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग यांना गोपनिय

बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ मध्ये हददपार असलेला

अभिलेखावरील गुन्हेगार इसम नामे निशिकांत निवास शिंदे रा. रेठरेकर कॉलनी कराड हा त्याचे राहते घरी येणार

असुन, तो त्याचेसोबत पिस्टल बाळगुन असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. सदर बातमीप्रमाणे त्यांनी सहा. पोलीस

निरीक्षक श्री. अमित बाबर यांना इतर अंमलदार यांना सोबत घेवुन सापळा रचुन कारवाई करणेबाबत आदेश दिला.

त्याप्रमाणे पोलीस पथकाने संशयिताचे घराचे दुतर्फा सापळा रचुन दबा धरुन अभिलेखावरील व तडीपार असलेला

गुन्हेगार निशिकांत निवास शिंदे रा. रेठरेकर कॉलनी कराड यास देशी बनवाटीचे पिस्टल किंमत अंदाजे रु.७५०००/-

दोन पितळी धातुचे पिस्टलचे जिवंत राऊंड किंमत अंदाजे रु.१२००/- व मोबाईल फोन किंमत अंदाजे रु.१००००/-

यासह ताब्यात घेतले. सदर गुन्हेगार हा मा. पोलीस अधीक्षक साो सातारा यांचेकडील आदेश क्र. स्थागुशा-०४/२४,

म.पो.का.क.५५/१४२९/२४ सातारा दि.०५/०६/२०२४ अन्वये पुर्ण सातारा व सांगली जिल्हयाचे शिराळा, वाळवा,

कडेगाव, आटपाडी तालुक्यांचे हददीतुन दोन वर्षांकरीता हददपार आहे. संशयिताविरुध्द कराड शहर पोलीस ठाणेस

गुन्हा नोंद दाखल आला असुन, पुढील तपास पोउनि देवकर हे करीत आहेत.

मा.पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख यांनी सातारा जिल्हयाचा कार्यभार स्विकारल्यापासुन अनेक

बेकायदेशीर अग्निशस्त्रे (पिस्टल) बाळगणाऱ्या तसेच विक्री करण्याऱ्या गुन्हेगारांविरुध्द कारवाईचा धडाका लावला

आहे. त्यांचे मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा पोलीस दलाने ९१ देशी बनवाटीचे पिस्टल, ३ बारा बोअर, १ रायफल,

२०१ जिवंत काडतुसे, ३८५ रिकाम्या पुंगळ्या, १ रिकामे मॅग्झिन असे जप्त करुन संबंधितांविरुध्द कायदेशीर

कारवाई केली आहे.

मा. पोलीस अधीक्षक साो समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक साो आंचल दलाल यांचे मार्गदर्शनाखाली

श्री. अमोल ठाकुर उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग, सहा. पोलीस निरीक्षक, श्री. अमित बाबर, पोलीस

अंमलदार प्रशांत चव्हाण, प्रविण पवार, सागर बर्गे, दिपक कोळी यांनी सदरची कारवाई केली. सदर कारवाईबाबत

मा. पोलीस अधीक्षक साो समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक साो आंचल दलाल यांनी उपविभागीय पोलीस

अधिकारी अमोल ठाकूर व पथकातील अधिकारी अंमलदार यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.


Post a Comment

0 Comments