Type Here to Get Search Results !

महामार्गावरील खड्डे 15 ऑगस्ट पर्यंत न बुजवल्यास गुन्हे दाखल करणार- पालकमंत्री शंभूराज देसाई

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

महामार्गावरील खड्डे 15 ऑगस्ट पर्यंत न बुजवल्यास गुन्हे दाखल करणार- पालकमंत्री शंभूराज देसाई.



सातारा, दि. 5 (जिमाका) :  सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.4 या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्डयामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. येत्या 15 ऑगस्टपर्यंत सर्व खड्डे बुजवावेत, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले.


 जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात राष्ट्रीय महामार्ग क्र.4 च्या संदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीत पालकमंत्री श्री. देसाई बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समिर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.


 राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने येत्या 15 ऑगस्ट पर्यंत खड्डे बुजविले नाहीत तर गुन्हे दाखल करणार, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या रस्त्यांवरील खड्डेही बुजवावेत. कुठेही अपघात होणार नाही यासाठी रस्ता सुस्थितीत आणावा. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक घ्यावी, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत केल्या.


Post a Comment

0 Comments