Type Here to Get Search Results !

अमीर मुजावर टोळीतील ०५ इसमांना सातारा पोलीसांनी दोन वर्षाकरीता केले तडीपार

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

अमीर मुजावर टोळीतील ०५ इसमांना सातारा पोलीसांनी दोन वर्षाकरीता केले तडीपार .






सातारा जिल्हयातील सातारा शहर परिसरातील शरिराविरुध्दचे / मालमत्तेविरुध्दचे

सराईतपणे गुन्हे करणाऱ्या अमीर मुजावर टोळीतील ०५ इसमांना सातारा पोलीसांनी दोन वर्षाकरीता केले तडीपार 

सातारा जिल्हयामध्ये सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारे टोळी प्रमुख १) अमीर

इम्तीयाज मुजावर वय २३ वर्षे रा. पिरवाडी ता. जि. सातारा २) आमीर सलीम शेख वय २३ वर्षे रा. वनवासवाडी, कृष्णानगर

ता.जि.सातारा ३)अभिजीत ऊर्फ आबु राजु भिसे वय २१ वर्षे रा. आदर्शनगरी शेजारी सैदापुर, सातारा ता.जि.सातारा ४)

यश सुभाष साळुंखे वय वय १९ वर्षे, रा. ४०४ शिंदे फर्निचरचे पाठीमागे मोळाचा ओढा सातारा. ५) अलिम नजीर शेख

वय - १९ वर्षे, रा. आयटीआय रोड मोळाचा ओढा सातारा यांचे टोळीवर सातारा शहर पोलीस ठाणे येथे खुन करणे, दरोडा

टाकणे, खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत पोचवणे, बेकायदेशीर जमाव जमवुन मारहाण करुन दुखापत करणे, बेकायदेशीर

शस्त्राचा वापर करणे, शिवीगाळ दमदाटी करणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने सातारा शहर पोलीस ठाणेचे प्रभारी

अधिकारी श्री. आर. बी. मस्के, पोलीस निरीक्षक सातारा शहर पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा

कलम ५५ प्रमाणे संपुर्ण सातारा जिल्हयातुन दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक

सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी श्री. किरणकुमार सुर्यवंशी उपविभागीय पोलीस अधिकारी,

सातारा भाग सातारा यांनी केली होती.

सदर टोळीतील इसमांचेवर दाखल असले गुन्हयांमध्ये त्यांचेवर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनही

त्यांचेवर गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. या टोळीमधील इसम हे सातारा शहर तसेच परिसरामध्ये

सातत्याने गुन्हे करीत होते, त्यांचेवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्यामुळे सातारा शहर परिसरातील लोकांना मोठया

प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता, अशा टोळीवर सर्वसामन्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती.

वरील टोळीला मा.समीर शेख, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर सुनावणी होवुन सदर

टोळीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये संपुर्ण सातारा जिल्हयाचे हद्दीतुन दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत

केला आहे.

नोव्हेंबर २०२२ पासुन मपोकाक ५५ प्रमाणे २९ उपद्रवी टोळयांमधील ९४ इसमांना, मपोकाक ५६ प्रमाणे २८

इसमांना, मपोकाक ५७ प्रमाणे ०३ इसमांना असे एकुण १२५ इसमांविरुध्द तडीपार सारखी कारवाई करण्यात आली असुन

भविष्यातही सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया

करणेत येणार आहेत.

या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे

मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पो.हवा प्रमोद सावंत,

अमित सपकाळ, पो.कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, सातारा शहर पोलीस ठाणेचे पोहवा दिपक इंगवले, संदीप

पवार, पोकॉ अमोल सापते यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.

Post a Comment

0 Comments