Type Here to Get Search Results !

पिंपळवाडी गावचे सुपुत्र गणेश निंबाळकर यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक(Api) पदी पदोन्नती.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

साखरवाडी/वैभव जगताप 

 पिंपळवाडी गावचे सुपुत्र गणेश निंबाळकर यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक(Api) पदी पदोन्नती.



साखरवाडी पिंपळवाडी गावचे सुपुत्र श्री.गणेश निंबाळकर यांची पोलीस उपनिरीक्षक पदावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावरती पदोन्नती झाल्याबद्दल त्यांना इलेव्हन स्टार फुटबॉल क्लब व बालाजी ग्रुप साखरवाडी यांच्या वतीने श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री.नितीन शाहुराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. खरंतर श्री.गणेश निंबाळकर व या सर्व ग्रुप यांचे ऋणानुबंधाचे नाते आहे लहानपणापासून यांचे मैत्रीचे अतूट नाते आहे आज आपल्या मित्राची गरुड झेप च्या दिशेने वाटचाल होत असताना सर्व सवंगडींना आनंद होत असताना दिसून आले. कारण गणेश निंबाळकर यांचा स्वभावाचा असा आहे की नाते मैत्रीच्या पलीकडचे आजही त्यांचा अधिकारी म्हणून गौरव करण्यात आला परंतु त्यांची देहबोली  इतकी गोड होती की आजही तोच लहानपणीचा मित्र म्हणूनच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

Post a Comment

0 Comments