Type Here to Get Search Results !

मोटार सायकली व विहीरिवरील मोटारी चोरी करणा-या टोळीच्या लोणंद पोलीसांनी आवळल्या मुसक्या घग‌

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

मोटार सायकली व विहीरिवरील मोटारी चोरी करणा-या टोळीच्या लोणंद पोलीसांनी आवळल्या मुसक्या 


लोणंद पोलीस ठाणे हददीत नागरिकांच्या मोटार सायकली व शेतक-यांच्या विहीरिवरील इलेक्ट्रीक

मोटारी चोरी झालेबाबत गुन्हे दाखल झालेले होते. सदर गुन्हयाचे तपासाबाबत मा. पोलीस अधीक्षक सो

सातारा समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक साो. आंचल दलाल मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी

श्री. राहुल धस सो, यांनी सुचना दिल्या होत्या. त्या प्रमाणे वरीष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनावरुन लोणंद पोलीस

ठाण्याचे प्रभारी श्री. सुशिल भोसले, सहाय्यक पोलीस निरिक्षक व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी

सदर घडणा-या गुन्हयांबाबत गोपणीय खब-यांमार्फत माहीती मिळवुन मिळाले माहीतीचे आधारे यातील आरोपी

निष्पन्न केले.

दिनांक ०६/०८/२०२४ रोजी यातील आरोपी हे सासवड ता. पुरंदर येथे असलेबाबत माहीती

मिळाल्याने मा. वरीष्ठ अधिकारी सो. यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सुशिल भोसले, सहायक पोलीस निरिक्षक व

गुन्हे प्रकटीकरण पथकाने आरोपींना ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणले. त्यांचेकडे अधिक विचारपुस

केली असता त्यांने व त्याचे साथीदारांनी मिळुन लोणंद पोलीस ठाणेचे हद्दीत खालील प्रमाणे मोटार सायकल

चोरीचे २ व विहीरिवरील इलेक्ट्रीक मोटारी चोरीचे ३ गुन्हे केलेची कबुली दिली असुन आरोपींकडुन मो /

सायकली व इलेक्ट्रीक मोटारी असा एकुण १,०७,०००/- (एम लाख सात हजार रु) किमतीचा मुददेमाल

हस्तगत करण्यात आहे 

सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधीक्षक साो सातारा समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक साो.

आंचल दलाल मॅडम, मा.उपविभागीय पोलीस अधीकारी साो. राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस

स्टेशनचे इनचार्ज सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुशिल भोसले, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोहवा. संतोष

नाळे, सर्जेराव सुळ, विठ्ठल काळे, केतन लाळगे, अभिजित घनवट तसेच पोहवा. संजय बनकर यांनी सदर

कारवाई मध्ये सहभाग घेतला असुन त्यांचे मा. पोलीस अधिक्षक सो सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments