Type Here to Get Search Results !

बोरगाव पोलिसांनी अट्टल मोटरसायकल चोरास केले जेरबंद

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

बोरगाव पोलिसांनी अट्टल मोटरसायकल चोरास केले जेरबंद.


 

(बोरगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडाकेबाज कामगिरी )

( पोलीस अभिलेखावरील अट्टल मोटारसायकल चोरट्यास जेरंबद करुन गुन्ह्यातील चोरीस गेलेली हिरो

कंपनीची स्प्लेंन्डर आय स्मार्ट मोटारसायकल व आणखी 5 दुचाकी वाहने असा एकुण 4,28,000/-रु

(चार लाख अठ्ठावीस हजार रुपये) किंमतीची मोटारसायकली केल्या जप्त )

श्री समीर शेख पोलीस अधिक्षक सो सातारा व श्रीमती आंचल दलाल, अप्पर अधिक्षक सातारा यांनी

घरफोडी, चोरी, मोटारसायकल चोरी असे गुन्हे उघडकीस आणुन कारवाई करण्याच्या सुचना श्री राजीव नवले उपविभागीय

पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा व श्री रविंद्र तेलतुंबडे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरगाव पोलीस ठाणे यांना दिलेल्या

होत्या त्या अनुषंगाने श्री रविंद्र तेलतुंबडे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरगाव पोलीस ठाणे यांनी बोरगाव गुन्हे प्रकटीकरण शाखा

यांना कारवाईबाबतच्या सुचना दिल्या होत्या.

बोरगाव पोलीस ठाणे गुरनं-331/2024 भा. न्याय. सं. कलम-303 (2) प्रमाणे दिनांक- 15/07/2024 रोजी मौजे

नागठाणे ता. जि. सातारा येथुन एक सिल्व्हर निळ्या रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंन्डर आय स्मार्ट 60,000/- रु किंमतीची

मोटारसायकल चोरीस गेलेबाबतचा गुन्हा दाखल झाला होता. त्याबाबत श्री रविंद्र तेलतुंबडे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरगाव

पोलीस ठाणे यांनी बोरगाव गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस नाईक प्रशांत चव्हाण, केतन जाधव, बाळासाहेब जानकर यांना गुन्हा

उघडकीस आणणेबाबत योग्य त्या सुचना दिल्या होत्या. गुन्हेप्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग

करीत असताना मौजे निसराळे ता. जि. सातारा गावच्या हद्दीत पुणे बेंगलोर हायवेचे पुलाखाली सातारा जिल्हा पोलीस

अभिलेखावरील माहितगार गुन्हेगार हा होन्डा शाईन विना नंबरप्लेट असलेल्या मोटारसायकलवरुन जात असताना आरोपी  संभाजी बबन जाधव वय-39 वर्षे रा-अतीत ता.जि.सातारा त्याचा

संशय आल्यामुळे त्याला थांबबुन त्याचेकडे सदर मोटारसायकल व तिचे कागदपत्राबाबत विचारणा केली असता तो

उडवाउडवीची उत्तरे देवु लागल्याने त्यास विश्वासात घेवुन अधिक चौकशी केली असता त्याने सदरची मोटारसायकल ही सातारा

शहरातील व्हाय.सी. कॉलेज परीसरातुन चोरुन आणली असल्याचे सांगितले. त्याचेकडे अधिक चौकशी करता त्याने आणखी 3

मोटारसायकल व 2 मोपेड अशी एकुण 6 वाहने नागठाणे, सातारा शहर, खंडाळा या ठिकाणावरुन चोरी करुन अतीत गावच्या

हद्दीत लपवुन ठेवलेल्या आहेत असे सांगितलेने सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता 5 वाहने मिळुन आली. सदर वाहनांचा

पंचनामा करुन सर्व 6 वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. सदर इसमाने मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यास

सदर गुन्ह्यामध्ये अटक करुन त्याचेकडुन बोरगाव पोलीस ठाणे गुन्ह्यातील चोरीस गेलेली एक सिल्व्हर निळ्या रंगाची हिरो

कंपनीची स्प्लेंन्डर आय स्मार्ट मोटारसायकल तसेच आणखी 5 मोटारसायकली अशा एकुण 4,28,000/-रु किंमतीच्या

मोटारसायकली हस्तगत केलेल्या आहेत. सदर वाहनांची माहिती खालील प्रमाणे आहे.

1) होन्डा कंपनीची शाईन काळ्या रंगाची विना नंबरप्लेट असलेली मोटारसायकल

2) हिरो कंपनीची स्प्लेंन्डर आय स्मार्ट सिल्व्हर निळ्या रंगाची विना नंबरप्लेट असलेली मोटारसायकल

3) हिरो कंपनीची स्प्लेंन्डर प्रो काळे रंगाची राखाडी पट्टा असलेली विना नंबरप्लेट असलेली मोटारसायकल

4) हिरो कंपनीची स्प्लेंन्डर प्लस काळे रंगाची निळा लाल पट्टा असलेली विना नंबरप्लेट असलेली मोटारसायकल

5) होन्डा कंपनीची अॅक्टीव्हा मोपेड काळ्या रंगाची MH11-BR-4618 नंबरप्लेट असलेली मोटारसायकल

6) हिरो होन्डा कंपनीची प्लेजर मोपेड काळ्या रंगाची MH11-AJ-1781 नंबरप्लेट असलेली अशा मोटारसायकल जप्त

करण्यात आलेल्या आहेत. सदर वाहनांपैकी 3 मोटारसायकलचे चोरीस गेलेबाबतचे गुन्हे खंडाळा, शाहुपुरी व बोरगाव पोलीस

ठाणे येथे दाखल आहेत.

सदरची कारवाई ही मा. श्री समीर शेख पोलीस अधिक्षक सो सातारा व श्रीमती आंचल दलाल, अप्पर अधिक्षक

सातारा, श्री राजीव नवले उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा व श्री रविंद्र तेलतुंबडे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे

सुचनेप्रमाणे व त्यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस नाईक प्रशांत चव्हाण,पोकॉ केतन जाधव, पोकॉ

बाळासहेब जानकर, विशाल जाधव यांनी सदरची कारवाईत सहभाग घेतलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोहवा प्रविण शिंदे हे

करीत आहेत.


Post a Comment

0 Comments