सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/ वैभव जगताप
साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागात डॉक्टर एस. बी.कोंडके यांचे आरोग्यविषयक व्याख्यान.
साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागात साखरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एस. बी.कोंडके यांनी विद्यार्थ्यांना साथरोगाच्या अनुषंगाने कीटकजन्य व पा णीजन्य आजार या विषयावर व्याख्यान दिले. साथीचे आजार होऊ नयेत म्हणून घ्यावयाची काळजी व झालेच तर करावयाच्या उपाययोजना यासंबंधी सखोल मार्गदर्शन डॉक्टर कोंडके यांनी केले. याप्रसंगी साखरवाडी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री तुळशीदास बागडे , प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक श्री एल. एस.वणवे , लेखनिक श्री एस. एस.गायकवाड ,आशा स्वयंसेविका सौ अनिता खुडे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.तत्पूर्वी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना डॉक्टर कोंडके यांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.संपूर्ण सूत्रसंचालन व प्रास्ताविक सहाय्यक शिक्षक श्री हरिदास सावंत यांनी केले.

Post a Comment
0 Comments