सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
मल्हारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील नागरीकांचे गहाळ / चोरी झालेले ३,७३,०००/- रुपये किमतीचे एकूण १७ मोबाईल हस्तगत आणि मूळतक्रारदारांना परत.
(मल्हारपेठ पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी)
मा. समीर शेख पोलीस अधिक्षक सो, सातारा, मा. आँचल दलाल अप्पर पोलीस
अधिक्षक साो, सातारा, मा. सविता गर्जे, पोलीस उपअधिक्षक सो पाटण विभाग यांचे
मार्गदर्शनाखाली मल्हारपेठ पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. चेतन मछले यांनी
नागरीकांचे हरविलेले मोबाईल शोध घेणेकामी मल्हारपेठ पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस
अंमलदार यांचे पथक तयार करुन त्यांना सूचना दिलेल्या होत्या त्या अनुशंगाने पथकातील
पोलीस स्टाफ ने सी. ई. आय. आर. पोर्टल व इतर तांत्रिक बाबीचे आधारे हरवलेले मोबाईल
बाबतची माहीती प्राप्त करुन चिकाटीने व अथक परीश्रम करुन सदरची मोहीम राबविल्याने
मल्हारपेठ पोलीस ठाणे हद्दीतून नागरीकांचे गहाळ / चोरी झालेले एकूण ३,७३,००० /- रुपये
किमतीचे एकूण १७ मोबाईल हस्तगत करण्यात यश आलेले आहे. आज रोजी मा. श्री. चेतन
मछले, सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारपेठ पोलीस ठाणे याचे हस्ते मूळ तक्रारदारांना त्यांचे
मोबाईलचे वाटप करण्यात आले. सदरची मोहीम मा. समीर शेख पोलीस अधिक्षक सो
सातारा, मा. आँचल दलाल अप्पर पोलीस अधिक्षक साो सातारा, मा. सविता गर्जे, पोलीस
उपअधिक्षक साो, पाटण विभाग यांचे मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारे सातत्याने मोहीम
राबविण्यात येणार असल्याचे मल्हारपेठ पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. चेतन मछले
यांनी सांगितले आहे.
सदरची कारवाई मा. समीर शेख पोलीस अधिक्षक साो, सातारा, मा. आँचल दलाल
अप्पर पोलीस अधिक्षक साो, सातारा, मा. सविता गर्जे, पोलीस उपअधिक्षक सो, पाटण
विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली मल्हारपेठ पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस
निरीक्षक श्री. चेतन मछले, पोलीस उपनिरीक्षक श्री. नितेश पोटे, पोलीस उपनिरीक्षक
श्री. रामराव वेताळ, पोलीस कॉन्स्टेबल श्री. सिध्दनाथ शेडगे, सायबर पोलीस ठाणेचे पोलीस
कॉन्स्टेबल श्री. महेश पवार यांनी केलेली आहे.

Post a Comment
0 Comments