सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी वैभव जगताप
साखरवाडी भागात बेकायदेशीर मटका (जुगार) व्यवसाय करणाऱ्यांच्यावर फलटण ग्रामीण पोलिसांची कडक कारवाई.
साखरवाडी ता. फलटण जि. सातारा येथील काही भागामध्ये मटका, हातभट्टी दारू विक्री,ताडी विक्री जोमात चालू असताना फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून कायदेशीर कारवाई केलेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी बाळु प्रल्हाद अहिवळे वय 51 वर्ष रा.साखरवाडी हा स्वतःच्या राहत्या घरामध्ये कल्याण नावाचा मटका चालवत असताना फलटण ग्रामीण पोलीसांनी छापा टाकून रंगेहाथ पकडले आहे.व आरोपी राजेंद्र उत्तम चांगण रा.खामगाव हा सुद्धा काळुबाई चौक येथे कल्याण नावाचा मटका व्यवसाय करत असल्याची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल हणमंत गुलाबराव दडस यांनी दिली आहे.आणि आरोपी बाळु पांडुरंग मदने वय 62 वर्ष रा.पाच सर्कल, खामगाव ता.फलटण जि.सातारा हा चांदणी चौक साखरवाडी येथे बेकायदेशीर कल्याण नावाचा मटका व्यवसाय चालवत असताना फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार पी.बी.हजारे यांनी रंगेहाथ पकडले आहे या सर्व घटनेचा गु.र.नं.व कलम 855/2024 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 12अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment
0 Comments