Type Here to Get Search Results !

फलटण एसटी बस स्थानकावर एक पिसटल व तीन काडतुसासह एकास पकडले.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

फलटण एसटी बस स्थानकावर एक पिसटल व तीन काडतुसासह एकास पकडले.


फलटण बस स्थानकावर एक पिस्टल व तीन जिवंत काडतुसासह संशयास्पद इसम असल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल अतुल बडे वय 34 वर्ष यांनी दिली असता 

फलटण एसटी बस स्थानकावर फलटण शहर पोलीसांनी आरोपी रोहित सुरेश तावरे वय 34 वर्ष मुळ गाव सांगवी ता.बारामती जि.पुणे या इसमास पुणे जिल्ह्यामध्ये शस्त्र वापरणेस परवानगी असताना सदर परवान्याचा भंग करुन ते शस्त्र सातारा जिल्ह्यातील फलटण येथील एसटी बस स्थानकावर मिळुन आल्या प्रकरणी फलटण शहर पोलीसांनी गु.र.नं व कलम 421/2024 शस्त्र अधिनियम कलम 30 महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम  37(1)(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर घटनेचा अधिक तपास फलटण शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments