Type Here to Get Search Results !

वीज चोरी प्रकरणी फलटण शहरांमध्ये एकावर गुन्हा दाखल.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

वीज चोरी प्रकरणी फलटण शहरांमध्ये एकावर गुन्हा दाखल. 


Mk बाजार सर्वे नंबर 71/4 बुवासाहेब नगर फलटण सातारा येथील आरोपी महावीर संभाजी कोकरे राहणार बुवासाहेब नगर फलटण.यांनी वीज चोरी केल्याची फिर्याद वर्षा संतोष गायकवाड वय 48 वर्ष व्यवसाय नोकरी यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली असता आरोपीवर गु.र.नं व कलम 419/2024 विद्युत कायदा 2003 कलम ,(1A) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

सदर वीज मीटर व परिसराची सखोल तपासणी केली असता असे निदर्शनात आले की पोल वरून आलेली इन्कमिंग सर्विस वायरला विज मीटरच्या अगोदर पत्र्याच्या शेडवर टॅप करून एमसीबी च्या साह्याने वीज मीटरवर वीज वापरण्याची योग्य नोंद होणार नाही अशी व्यवस्था करून वीज चोरी चालू असल्याचे स्पष्ट दिसून आले वीज चोरी करणारे यांना व्यावसायिक दराने 41 महिने कालावधीचे 17572 युनिटचे 368850/-रुपयाचे व तडजोड देयक 10000 रुपये विज चोरी देयक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित फलटण अर्बन उपविभागीय कार्यालयामार्फत देण्यात आले वीज बिल व तडजोड देयक वीज ग्राहक महावीर संभाजी कोकरे यांनी भरले नाही यांचे विरुद्ध लबाडीने अप्रमाणिक हेतूने वीज चोरी करून कंपनीचे फसवणूक केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुरज शिंदे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments