सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
साडे अकरा लाख रुपये किमतीच्या सेंट्रींग कामाच्या ९५ लोखंडी प्लेटा चोरणाऱा आरोपी पुसेगाव पोलिसांच्या ताब्यात.
(साडे अकरा लाख रुपये किमतीच्या सेंट्रींग कामाच्या ९५ लोखंडी प्लेटा बोलेरो पिकअप
गाडीतून नेऊन विक्रीच्या तयारीत असणा-या सराईत चोरटयास संपूर्ण मुददेमालासह पुसेगाव
पोलीसांनी दोन तासात केले जेरबंद)
मौजे खातगुण ता. खटाव गावचे हददीतील वेदावती हायस्कूल शाळेच्या जवळ घरमालक
अमोल दिलीप जाधव यांचे नवीन घराचे बांधकाम चालू असले ठिकाणी यातील बांधकाम ठेकेदार
हणमंत हैबती आसंगी रा. पुसेगाव ता. खटाव यांनी घराचे बांधकामाचे स्लॅबसाठी ९५ लोखंडी प्लेटा
आणून बांधकाम साईटवर ठेवलेल्या होत्या. स्लॅबसाठी ठेवलेल्या सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या
९५ लोखंडी प्लेटा दिनांक २४/०८/२०२४ रोजी सायंकाळी ६.३० वा. ते दिनांक २५/०८/२०२४ रोजीचे
सकाळी ०७.०० वाजणेचे दरम्यान रात्रीचे वेळी कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरुन नेलेबाबतची
तक्रार यातील फिर्यादी बांधकाम ठेकेदार हणमंत हैबती आसंगी रा. पुसेगाव ता. खटाव यांनी दिनांक
२५/०८/२०२४ रोजी पुसेगाव पोलीस ठाणेस दिलेली होती.
सदर गुन्हयातील सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या ९५ लोखंडी प्लेटा चोरणारे आरोपींना
निष्पन्न करुन त्यांना गुन्हयामध्ये अटक करुन गुन्हयातील चोरीस गेलेला माल जप्त करणे हे
पुसेगाव पोलीसांचे समोर खूप मोठे आव्हान होते. सदर चोरीच्या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेत
दोन दिवसांपुर्वीच पुसेगाव पोलीस ठाणेचा कार्यभार स्वीकारलेले श्री. संदीप पोमण सहाय्यक पोलीस
निरीक्षक पुसेगाव पोलीस स्टेशन यांनी पुसेगाव पोलीस स्टेशनचे त्यांचे सहकारी व गोपनीय
बातमीदारांच्या मदतीने अज्ञात आरोपीचा शोध घेणेकामी अथक परिश्रम करुन, सापळा रचून गुन्हा
दाखल झाल्यापासून दोन तासांचे आत आरोपीचा व चोरीस गेलेल्या मालाचा तसेच गुन्हयात
वापरलेल्या चारचाकी वाहनाचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणला. सदर गुन्हयामधील फिर्यादी
यांच्या बांधकामासाठी ठेवलेल्या सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या लोखंडी प्लेटा चोरुन बोलेरो
अॅक्स पिकअप गाडीतून नेऊन विक्री करण्याच्या तयारीत असणारा सराईत आरोपी नामे सोमनाथ
ऊर्फ बाल्या शरद लावंड वय ३२ वर्षे, रा. खातगुण ता. खटाव जि.सातारा यास सापळा रचून मोठया
शिताफीने ताब्यात घेऊन त्याचेकडून गुन्हयातील चोरीस गेलेल्या दीड लाख रुपये किमतीच्या
लोखंडी प्लेटा व व चोरीचा माल विक्रीसाठी वापरलेली दहा लाख रुपये किमतीची पांढ-या रंगाची
बोलेरो अॅक्स पिकअप गाडी नंबर एम.एच.०९ एफ.एल. ९७३६ असा एकूण साडे अकरा लाख रुपये
किमतीचा संपूर्ण मुददेमाल ताब्यात घेऊन आरोपीस गुन्हयाचे कामी तात्काळ अटक करण्यात आली
आहे.पुसेगाव पोलीसांच्या या धडाकेबाज कामगिरीबददल पुसेगाव पोलीस स्टेशनचा दोन
दिवसापुर्वीच चार्ज घेणारे श्री. संदीप पोमण सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे व त्यांचे सहका-यांचे
जनतेतून कौतुक व अभिनंदन होत आहे.
श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती सोनाली कदम उपविभागीय पोलीस
अधिकारी कोरेगाव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. संदीप पोमण, सहाय्यक
पोलीस उपनिरीक्षक सुधाकर भोसले, पोलीस हवालदार तात्या ढोले, दौलत कुदळे, योगेश बागल,
पोलीस नाईक सुनिल अबदागिरे, अशोक सरक, तुषार बाबर, पोलीस काँस्टेबल शंकर सुतार,
ज्ञानेश्वर जाधव यांनी सदरची कारवाई केली आहे. कारवाई पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक व श्रीमती सोनाली कदम उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment
0 Comments