सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/ वैभव जगताप
साखरवाडी मुरूम रोडवर अवजड वाहतूकीमुळे रोडची दयनीय अवस्था.
साखरवाडी खामगाव ता.फलटण हद्दीतील काळुबाई चौक येथून जाणारा मार्ग हा मुरूम-पाडेगाव-सोमेश्वरला जोडला जातो. आणि ज्या ठिकाणी मळीचा टँकर खचलेला आहे त्याच ठिकाणाहून थोड्याच अंतरावरती इंग्लिश मीडियम स्कूल आहे व नागरिकांची वसाहत आहे, येथील स्थानिक नागरिकांना व येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व पालकांना या वाहनांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे कारण ही जी वाहणे आहेत हे भरधाव वेगाने चालक चालवत असतात.
आज चालकाच्या चुकीमुळे वाहन क्रमांक MH43 Y 1020 रस्ता सोडून बाहेर गेलेले आहे, या वाहणाचे नुतनीकरण केले आहे का किंवा त्या वाहणाला वाहतूक परवाना नक्की कुठला व कशाचा आहे हे तपासणार कोण यासाठी फलटण तालुक्यामध्ये वाहतूक नियंत्रक विभाग कार्यान्वीत आहे की नाही ?यातच काही मोठी दुर्घटना घडली असती तर याला जबाबदार कोण ? अगोदरच या रस्त्याच्या दुरुस्तीकडे कुठल्याही लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही, परंतु या चुकीच्या वाहतुकीचा सर्वसामान्य नागरिकांना भयंकर त्रास होत आहे.या कडे स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी व तालुका पातळीवरील लोकप्रतिनिधी या नागरिकांच्या समस्यांचे निवारण करणार कधी असा प्रश्न नागरिकांच्या मधून उपस्थित होत आहे.



Post a Comment
0 Comments