Type Here to Get Search Results !

आज दि.१८/८/२०२४ रोजी सातारा शहरातील वाहतूक व्यवस्थेत फेरबदल.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

आज दि.१८/८/२०२४ रोजी सातारा शहरातील वाहतूक व्यवस्थेत फेरबदल.


सातारा शहरात आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते लाडकी बहीण योजना अंतर्गत होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत फेरबदल 

सातारा शहरात मा. मुख्यमंत्री सो (एकनाथजी शिंदे साहेब), मा. उपमुख्यमंत्री सो मा. देवेंद्रजी फडणवीस,

मा. अजितदादा पवार यांचा दि. १८/०८/२०२४ रोजी लाडकी बहीण योजना अंतर्गत सैनिक स्कुल सातारा येथे

कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमावेळी वाहतुकीस कोणताही अडथळा होवु नये म्हणुन सकाळी ०८.०० ते

सायं.०६.०० वा.पर्यंत खालीलप्रमाणे वाहतुक व्यवस्थेत बदल करणेत येत आहे.

१) बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते बांधकाम भवन जिल्हा परिषदेसमोरील रस्ता हा वाहतुकीस सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश

बंदी करणेत येत आहे.

२) गोडोली नाका, साईबाबा मंदिर मार्गे जिल्हा परिषद चौक येथे येणेस सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करणेत येत

आहे.

३) कनिष्क मंगल कार्यालय बाजुकडुन जिल्हा परिषद चौक येथे येणेस सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करणेत

येत आहे.

* वाहतुकीकरीता पर्यायी मार्ग-

१) बॉम्बे रेस्टॉरंट बाजुकडुन सातारा शहरात येणारी वाहने ही अजंठा चौक, गोडोली नाका मार्गे पोवई नाका बाजुकडे

येतील.

२) पोवई नाका बाजुकडुन बॉम्बे रेस्टॉरंट बाजुकडे जाणारी वाहने ही बांधकाम भवन येथुन आर.टी.ओ. कार्यालय,

सैनिकनगर मार्गे बॉम्बे रेस्टॉरंट चौक बाजुकडे रवाना होतील.

* पार्किंग ठिकाणे-

१) ठक्कर सिटी- कराड, पाटण बाजुकडुन कार्यक्रमासाठी येणारी सर्व वाहने ही ठक्कर सिटी येथील मोकळ्या जागेत

पार्किंग होतील.

२) जुनी MIDC- कोरेगांव, रहिमतपुर, माण, खटाव बाजुकडुन येणारी सर्व वाहने ही जुनी MIDC मध्ये

रस्त्याचे कडेला पार्किंग होतील.

३) शाहु स्टेडीअम - वाई, महाबळेश्वर बाजुकडुन येणारी सर्व वाहने ही शाहु स्टेडीअम येथे पार्किंग होतील.

४) जिल्हा परिषद ग्राऊंड सातारा शहर व मेढा बाजुकडुन येणारी सर्व वाहने ही जिल्हा परिषद मैदान येथे पार्किंग

होतील.

५) वाढे फाटा-खंडाळा, फलटण बाजुकडुन येणारी सर्व वाहने ही वाढे फाटा पासुन सर्व्हिस रोडला पार्किंग होतील.

तरी या बदलाची सर्व नागरिकांनी नोंद घेवुन पोलीस दलास सहकार्य करावे.

Post a Comment

0 Comments