सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
ग्राहक परिषदेकडे आलेल्या तक्रारींचा निपटारा संबधित विभागांनी तात्काळ करावा.
सातारा दि. 2 (जिमाका) : ग्राहक परिषदेकडून अनेक तक्रार अर्ज पुरवठा कार्यालयास प्राप्त होत असतात. ते संबंधित विभागांना पाठविले जातात. संबंधित विभागांनी तक्रारी अर्जांचा तात्काळ निपटारा करावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य समितीचे सदस्य सचिव वैशाली राजमाने यांनी केले.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची पहिली बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य समितीचे सदस्य सचिव वैशाली राजमाने यांचे अध्यक्षतेखाली पार पडली परिषदेचे अशासकीय सदस्य आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शासनाच्या विविध योजनांचे डिजीटल पध्दतीने अर्ज भरुन घेतले जातात. बऱ्याचवेळा ई केवायसी केली नसल्याने त्यांना लाभ मिळण्यास विलंब होतो. नागरिकांनी ई केवायसी करुन घ्यावी. नागरिकांनी व ग्राहकांनी केलेल्या सेवा तक्रांरीवर संबंधित विभागांनी समन्वयाने प्रश्न मार्गी लावावेत, असेही निर्देशन श्रीमती राजमाने यांनी दिले. बैठकीत प्रवासी ग्राहक दिन दर सोमवारी व शुक्रवारी साजरा करण्यात येतो. एसटी महामंडळाने याबाबतची माहिती प्रसिध्दीस द्यावी. ग्रामीण भागातून शालेय ज्या बसेसमधून विद्यार्थी प्रसावर करतात त्या किमान सुस्थितीत असाव्यात. लांब पल्यांच्या गाड्यांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा. शिधापत्रिकांधारक ध्यान्यापासून वंचित राहू नयेत म्हणून उत्पनाचे दाखले महसूल विभागाने लवकरात लवकर द्यावेत. नागरिकांना जादा दराचा भार पडू नये म्हणून महावितरण करुन ठरवलेल्या वेळीच मिटर रिडींग करावे. वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणने कडक कारवाई करावी यासह अशासकीय सदस्यांनी मांडलेल्या आदी समस्यांवर विषयांवर बैठकीत चर्चा झाली.

Post a Comment
0 Comments