Type Here to Get Search Results !

फलटण येथील ज्वेलर्स दुकानातून महीलेने १८०००/-रु.किंमतीचा सोन्याचा दागिना चोरला.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

फलटण येथील ज्वेलर्स दुकानातून महीलेने १८०००/-रु.किंमतीचा सोन्याचा दागिना चोरला.


दि. ०५/०३/२०२४ रोजी रोजी शांती काका सराफ अँड सन्स, ज्वेलर्स दुकान, पृथ्वी चौक, रिंग रोड, फलटण येथे एका महिलेने हातचलाखी करून एक कानातील सोन्याच्या रींगाचा जोड चोरुन नेला होता. सदर बाबत फलटण शहर पोलीस ठाणे येथे गु.नों.क्र. 125/2024, कलम  379 IPC प्रमाणे गुन्हा दाखल होता. 

यातील महिला आरोपी सुनीता संजय साबळे, वय ४६ वर्षे, रा. शिंदे मळा, सांगली कुपवाड रोड, सांगली हिस  अटक केली असून  दिनांक ०२/०८/२०२४ रोजी मा. न्यायालयात हजर करण्यात आले असता, एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहा. पो. उपनिरीक्षक अनिल भोसले हे करीत आहेत. 

सदर कामगिरीत API नितीन शिंदे यांचेसह पो हवा सचिन जगताप, पो कॉ सचिन पाटोळे, काकासो कर्णे, अतुल बडे यांनी सहभाग घेतला. तसेच या कामगिरीत दहिवडी पोलीस स्टेशन चे API अक्षय सोनवणे, पो . शि.सागर लोखंडे, सहदेव साबळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments