सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
एस.टी. प्रवासात चोरलेला डेल कंपनीचा लॅपटॉप लोणंद पोलीसांनी शोधुन आरोपींना केली अटक.
लोणंद पोलीस स्टेशनची दमदार कारवाई.
दिनांक 31/7/2024 रोजी सकाळी 10.45 ते 11.00 वाजताचे दरम्यान लोणंद
एस.टी. स्टँड येथुन फिर्यादी निर्भय मिलींद पाटील रा. धनकवडी पुणे हे स्वारगेट ते गोंदवले जाणारे
एस. टी. बसमधुन प्रवास करीत असताना त्यांनी एस.टी.चे कॅरेजमध्ये त्यांचे पिशवीमध्ये डेल
कंपनीचा लॅपटोप व इतर साहीत्य ठेवले होते. सदरची पिशवी कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन
नेलेबाबत फिर्यादीने दिले फिर्यादीवरुन गुन्हा रजि. दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेऊन त्याचेकडुन 100% मुददेमाल हस्तगत
करणेकामी मा. श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, मा. आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक
सातारा, श्री. राहुल रा.धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांनी लोणंद पोलीस स्टेशनचे
प्रभारी अधिकारी श्री सुशिल बी. भोसले सहा. पोलीस निरीक्षक, यांना सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे
श्री सुशिल बी. भोसले यांनी पोलीस पथके तयार करुन तांत्रीक माहीतीचे आधारे सदरचा गुन्हा
सुनिल दत्तात्रय काळे व त्याची पत्नी रिना सुनिल काळे दोन्ही रा. निरा ता. पुरंदर जि. पुणे मुळ रा.
पिंपरे खुर्द ता. पुरंदर जि. पुणे यांनी केला असलेबाबत माहीती प्राप्त करुन त्यांना आज रोजी निरा
येथुन सापळा रचुन ताब्यात घेऊन त्यांना अटक करुन त्यांचेकडुन चोरीस गेलेला डेल कंपनीचा
लॅपटॉप हस्तगत केलेला आहे.
सदरची कारवाई मा. श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, मा. आँचल दलाल अपर
पोलीस अधीक्षक सातारा, श्री. राहुल रा. धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांचे
मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री सुशिल बी. भोसले सहा. पोलीस
निरीक्षक, पोउनि विशाल कदम, पोउनि महेंद्र सपकाळ, देवेंद्र पाडवी, धनाजी भिसे, संतोष नाळे,
विठठल काळे, सर्जेराव सुळ, आनंदा केंजळे, भारती मदने, अंकुश कोळेकर, नितीन भोसले,
सतीष दडस, अभिजीत घनवट, जयवंत यादव, संजय चव्हाण यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे.

Post a Comment
0 Comments